डान्स डान्स
डान्स डान्स
अगदीच काही महिन्यांपूर्वी एक नाचत असलेल्या छोट्या मुलीचं व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यांनी हा व्हिडिओ पहिला नसेल त्यांनी नेट वर जाऊन ' लिटिल सीता dancing' टाईप करून अवश्य पहावा आणि आनंद घ्यावा. रामनवमी किंवा दसऱ्याच्या वेळेस नगड्याच पार्श्वसंगीत सुरू असताना ही छकुली अगदी मनसोक्त नाचताना दिसते. सर्व देहभान विसरून नाचताना त्याचा सात्विक आनंद कसा घ्यावा अशी शिकवण ही मुलगी आपल्याला देत आहे. तीच वय जेमतेम तीन किंवा चार वर्ष असेल. खास गोष्ट अशी की तिचा नाच पाहून तिच्या भोवती जमलेली लोक सुद्धा जाम खुष होताना व हसताना ऐकायला येतात.एका निरागस मुलीच्या नगाडा ऐकून स्वतःच्या हात व पायांची सोप्या हालचाली वरून नाचत असताना मला जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे. काही लोकांना गोष्टी अगदी सहजच जमतात आणि त्यात नाच हा प्रकार सर्वांनाच जमेल असं नाही. पण ते या मुलीला जमलेल आहे आणि नाचताना तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून पडतो. जेमतेम मिनिट भराचा व्हिडिओ आहे पण एकदम मस्त. हा आनंदी व्हिडिओ मी अधून मधून पाहत असतो. थोडा मूड छान करायला म्हणून.
यूट्यूब
मुळे असे खूपशे व्हिडिओ
आता आपल्याला पाहता येतात. काही वर्षांपूर्वी केरळ
मधल्या ' जीमकी केमेल ' गाण्यावर तिथल्या महाविद्यालयीन मुली छान नाचल्या
आणि तो व्हिडिओ खूप
प्रसिद्ध झाला.
आपल्या
हातात फोन आणि त्यानं
कॅमेरा असल्यामुळे बऱ्याच गोष्टी जमायला लागल्या. गाणी, नाच, भाषण, व्हिडिओ
कॉलिंग किंवा वर सांगितलेल्या अश्या
छोटया छोटया आठवणी तुम्ही कॅमेऱ्यात बंधिस्त करू शकता.
ज्या
कामात आपल्याला आनंद मिळतो तो
आपोआप तुमच्या चेहऱ्यावर दिसून पडतो. नाचणे हा प्रकार
मला कधी जमलं नाहीं
अस नाही पण वेळ
मारून नेण्यां इतपत मी लग्न
वरातीत, होळीत, पार्टीत नक्कीच करू शकतो. पण
खरं सांगू तर मला
लोकांना नाचताना पाहण्यात जास्त मजा वाटली आहे.
माझ्या मित्रमंडळीत एकापेक्षा एक कलाकार आहेत पण मला नाचण्याचा स्वाभाविक गुण असलेल्या एकच मित्र आठवतो आणि तो आहे विलास. नुसती संदलची थाप ऐकली की हा बहाद्दर सर्व कामधाम सोडून लागला नाचायला. महाविद्यालयीन काळात आमच्या रूम वर अभ्यास करत असताना समोरून वरात गेली आणि सोबत विलास असला की बास विचारूच नका...सगळ्यांना खेचुन खेचुन बँडच्या आवाजावर रूमवर डान्स पार्टी सुरू. कधी कुठे संदलचा आवाज आला की याच नाचणं सुरू. त्याच नाचणं पाहूनच मजा यायची. संदल ची थाप आणि याच्या शरीराची हरकत मॅच व्हायची. त्याचं शरीर थोड स्थूल असल्यामुळे कदाचित ते अजुन छान दिसायचं.
मला
आठवतं भिलाईला असताना देवदास बंजारे ची टीम यायची
शाळेत ' पंथी नृत्य ' शिकवायला.
या देवदास बंजारेना आम्ही टीव्ही वर सुद्धा पहायचो.
कमालीचं नाचायचा.
त्यांनी हा पंथी नृत्य
आंतर राष्ट्रीय स्तरावर नेला.
त्यांच्या
अंगात नाच भरलेला होता
असा म्हणायला हरकत नाहीं. पंथी
नृत्य करत असताना ताकत
पण खूप लागायची आणि
म्हणूनच छत्तीसगढ मध्ये देवदास बजारे हा एक अवलिया
म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळेस आकाशवाणी रायपूर वर ' रोंगोबती राँगोबती' लोकगीत
लागलं की आम्हाला मजा
वाटायची.
मी असा म्हणेन की
नाच आणि रीधम
याच छानस मेळ , हाच सगळ्यांमधला
कॉमन फॅक्टर...
मी काही कलात्मक नाचाचा
अभ्यासक नाही, पण मला स्वाभाविक
नाचणारे लोक पसंद पडतात.
देवांनी याच्यावर कृपा केली आहे
असं मला वाटत. त्यांना
नाचताना पाहिल की आनंद मिळतो.
आता
फिल्मी कलाकारांच म्हणाल तर भगवान
दादा, शम्मी कपूर, गोविंदा हे माझ्याकरता देव
आहेत. एक किस्सा आहे,
सनम तेरी कसम ची
शूटिग सुरू असताना कमल
हासन जेव्हा भगवान दादांना पहिल्यांदा भेटला तर सर्वात आधी
त्यांच्या पाया पडला. भगवान
दादांनी तू अस का
केलं विचारल्यावर कमल हासन नी
त्यांना सांगितला की माझ्या गुरूंनी मला
सांगितलं होतं की तुम्ही
भेटला की आशीर्वाद घेशील
आणि सोबत हे सुद्धा
सांगितलं की तुमच्यात नाचण्याचा जो
रिधम आहे तो खूपच
अजोड आहे.
हे खरही आहे भगवान
दादा, शम्मी कपूर आणि गोविंदा
यांना नाचताना पाहिल की ते किती
एन्जॉय करतात आहेत हे आपल्याला
लक्षात येतं. ते एन्जॉय करतात
आणि आपल्या करिता हा अनुभव भव्य
दिव्य ठरतो.
सध्या
नागपुरात कचरा गाडी आली
की त्यात वाजणार गाणं ' गाडीवाला
आया घरसे कचरा निकाल'
हे फारच मजेदार आहे.
त्याचं रिधमच असा आहे की
आपोआप आपले पाय हरकत करू
लागतात व नाचायला लागतात.
पण नाचत असताना ' कचरा
' होऊ नये हीच काळजी
मी सध्या घेत आहे.
अमित
नासेरी
Comments
Post a Comment