कू ची च्या बोगद्यात
मित्रांनो,
बोगद्यांच जाळं ??!!! आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट तर आहेच.
एका रक्तरंजित इतिहासाचे साक्षी हे असंख्य बोगदे आहेत. अमेरिकेसोबत युद्ध
करतांना इथल्या लोकांनी जमिनीच्या खाली या बोगद्यांच जाळं निर्माण केलं. जवळपास २५०
कीमी पर्यन्त हे जाळं पसरलेलं होत. हे बोगदे
निदान इतके छान बांधले गेलेत की त्यात सैनिकांच्या सभा, जेवण, हत्यारांचा पुरवठा, शत्रूवर हल्ला चढवून गायब होण, सैनिकांसाथी प्रशिक्षण अश्या अनेक
बाबींचा यात समावेश होता.
अमेरिकेचे सैनिक या युद्धकलेशी अवगत नव्हते.
जो पर्यन्त त्यांना कळलं तोपर्यंत मोठ नुकसान झालं होत. व्हिएतनाम मधल्या
लोकांच्या याच लढाऊ वृत्ती मुळे अमेरिकेला या युद्धातून काढता पाय घ्यावा लागला. दहा वर्षे युद्धं सरू होतं.
नंतर उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम याच एकीकरण ३० एप्रिल १९७५ वर्षी झालं आणि याच सायगोन
शहराचं नामांतर ‘हो ची मिन्ह’ म्हणून करण्यात आलं.
आज ‘कू ची टनेल कॉम्प्लेक्स’ म्हणून ही जागा पर्यटकांना आकर्षित करतेय. एक राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा याला मिळालं आहे. जगभरातील विशेषज्ञ या बोगद्यांचा अभ्यास करण्यासाठी येतात. पण माझ्या दृष्टीन या पूर्ण जागेला मी एक आगळा- वेगळा ‘ थीम पार्क ‘ म्हणीन. हो ची मिन्ह शहरात जो कोणी येतो त्यांनी इथे भेट देण आवश्यक आहे.
दर वर्षी लाखोंच्या संख्येत पर्यटक या बोगद्यांना पहायला येतात. इथे तुम्हाला गाइड पूर्ण जागेवर फिरवतात आणि त्या युद्धंकाळी काय व्हायच हे समजवतात. या जागेत अनेक देखावे आहेत. यात प्रामुख्याने सैनिकांची लपण्याची जागा, त्यांचं प्रशिक्षण, त्यांचं जेवण, त्यांची हत्यार ठेवण्याची जागा, शत्रूला कस संपवायच, दारू-गोळा तयार करण्याची जागा याच दर्शन तुम्हाला इथे मिळेल.
तुम्हाला बंदूक चालवायची असल्यास किम्मत देऊन
ती सुद्धा करता येते. मला सर्वात आवडलेला इथला प्रकार मी चित्रफितीच्या माध्यमातून
सोबत दिलाय. तुम्हा सर्वांना तो आवडेल अशी अपेक्षा.
अमित नासेरी
Khup chhan
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by the author.
Delete