चला फिरायला माझ्यासोबत !!!


पर्यटन व्यावसायिक लॉक डाउन उघडल्यावर थोडे आशावादी झालेत. विमानसेवा थोडीफार सुरू करण्यात आलीय. आंतर्राष्ट्रीय विमानसेवा काही प्रमाणात सुरू होतेय. कमीतकमी या सेवा सुरू केल्यामुळे आपले सुगीचे दिवस आलेत असं मुळीच नाही. कोविद 19 अजूनही संपुष्टात आलेला नाही, उलट तो वाढतोय.

आपल्या इथे लोकांनी शिस्त पाळली तर याला आटोक्यात आणायला वेळ नाही लागणार. पण तस घडत नाहीय. आज बाजारात भाजी विकत घेताना, किरणाच्या दुकानात, बागेत, चौकात, रसत्यात कुठेही पाहा आम्हाला काहीच होणार नाही अश्या तोर्‍यात लोकं फिरताएत. मास्क घालून सर्व साध्य झाल असं नाही. सामाजिक अंतर ठेवणं तेवढच आवश्यक आहे हा विचार अजूनही कोणाच्याच डोक्यात गेलेला नाही.

आमची मात्र पंचाईत झालीय !!!

तुम्ही विचाराल कस आणि का ??

आम्ही ठरलो पर्यटन व्यावसायिक. आज लोकं तीन चार महिन्यापासून घरी राहून कंटाळलीय. ही जाणीव आम्हाला आहे. आमच्या जवळ छान कार्यक्रम आहेत या सर्वांसाठी. नागपुर पासून अगदी खूप लांब नाही जायचं. इथे जवळपासच शंभर किलोमीटरच्या आत आम्ही तुम्हाला प्रकृतीच्या सानिध्यात काही कार्यक्रमांचा आनंद देतो.

एकदा येऊन तर पाहा !!!

सध्या बस आणि ट्रेन बंद आहेत. पण आपण स्वताच्या कार किव्हा बाइक वर इथे नक्कीच जाऊ शकता. ज्यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम घेतले जायचे त्यात काहीही फरक पडलेला नाही. जो काही पडलेला आहे तो सामाजिक अंतराचा आणि तुमच्या सुरक्षेचा !!!  तुमचं मास्क घालणं आवश्यक आहेच पण आम्ही सुद्धा सेनिटायझर आणि आज सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सोईसकट तयार आहोत.

आज ग्राहक आणि सेवा देणारे दोन्ही कडून ही काळजी घेणं आवश्यक झालय.  

ट्रेक, पक्षी निरीक्षण, जंगलात पायी फिरणं, काही हलके साहसीक खेळ ज्याचा आनंद पूर्ण परिवार घेऊ शकेल, एखाद्या शेतावर जाणं, कृषि पर्यटन, शेतावर जेवण, निसर्गरम्य तलावाच्या काठी डबा पार्टी,  तलावात मासे पकडण इत्यादि प्रकार तुम्हा सर्वांना पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.


पाहुण्यांची सुरक्षा महत्वाची, पण,एव्हढ्या सोई असून सुद्धा लोकांच्या मनातली भीती दूर होणार का?

हा प्रश्न आम्हा सर्वांना आहेच.

विचार करण्या सारखी गोष्ट आहे….

आज काही हॉटेल / रिसॉर्ट चित्रफिती बनवून ग्राहकांना त्यांच्या सुरक्षे बद्दल कशी काळजी घेतली जाणार हे  आधीच  कळवताएत. तिथले कर्मचारी मास्क, हात मोजे घालून स्वागत करण्यास उत्सुक आहेत, कुठलाही संपर्क न ठेवता फक्त एप्प वर रूम बूक करू शकता, पाहुण्यांच सामान सेनिटाइज करतात, तपमान घेतल जात, खोली सध्याचे नवीन नियम अनुसरून काळजीपूर्वक तयार केलेली असते,  होटलच्या किचन मध्ये सर्वात जास्ती काळजी घेतली जातेय. जेवण देताना सुद्धा सामाजिक अंतरची काळजी घेतात, हॉटेल सोडताना नुसत्या एप्प वर/ फोन वर सांगता येत. थोडक्यात, कुठेही संपर्क नाही पण काम अगदी व्यवस्थित होईल.  

वर दिलेली उत्कृष्ट चित्रफिती क्लब महिंद्राची आहे  पाहुण्यांचा आत्मविश्वास वाढावायला ......

इथे सर्व तयार असताना ग्राहकाच्या मनात जी भीती बसलीय त्यावर काही इलाज ?

येणारे काही महीने आपल्यासाठी परीक्षेचे आहेत. कदाचित वर्ष -दीड वर्ष सुद्धा लागू शकतात. पण फिरण्याची हौस तर भागवायची आहे. आपल्यासाठी वर दिलेले पर्याय सर्वात सुरक्षित आहेत. प्रकृतीच्या सान्निध्यात कोणालाही त्रास न देता आपण सर्व ही हौस पूर्ण करू शकता.

एकूण कल पाहता लोकं कुणाच्या भरवश्यावर न राहता स्वताच आपल्या गाडीतून फिरायला जातील. खूप दूर न जाता दिवसभरासाठीच जंगलात फिरतील , कृषि पर्यटन करतील , ट्रेक वर जातील, सायकल वर जातील   

 ( आपल्याकडे सायकल चालवणार्‍यांची संख्या वाढतेय ) आता प्रत्येकजण आपल्या तब्येतीची काळजी घेताय. अश्या काळात या सर्व सेवा संस्था टिकण्यासाठी ग्राहकाभिमुख होतीलच.

हलक्या साहसीक खेळाच्या सेवा  देणार्‍या संस्था यात सर्वात पुढे राहतील. ग्राहकांची सोय आणि गरजा पूर्ण करू शकले तर जिंकलेच समजा.

कृषि पर्यटनाला खरच खूप वाव राहील. आपल्या नागपूरच्या शंभर किलोमीटरच्या आत असलेल्या शेतकर्‍यांनी मनावर घेऊन लक्ष घातलं तर पैसे कमवायचा हा एक अजून पर्याय त्यांना मिळेल. शेती चांगली ठेऊन सोबतच पाहुण्यांना शेतावर बोलावून शेत फिरवा, चुलीवरचा स्वयंपाक खिलवा, शेतात कस रबायच हे शिकवा, शेतावरच काम कस असतं याची जाणीव करून द्या ......पण हे सर्व करत असतांना सामाजिक अंतर आणि तब्येत याच भान ठेवणं गरजेचं राहील.

गेल्या चार महिन्यामध्ये  आपल्याला प्रकृतीचे वाईट आणि चांगले, एकाच वेळा  दोन्ही रूप दिसलेत. कोविद 19 मुळे आज आपण घरी बंधीस्त झालो पण पर्यावरण मोकळ होणं, प्रदूषण कमी होणं, मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन दिसणं वगैरे प्रकार आपण पहिलेच आहेत.

प्रकृतीची हीच आर्त हाक समजून आता आपण सर्वांनी तिच्या कुशीत घालवावा.

तुम्हाला ट्रेक वर जायचं आहे? ........आम्ही आहोत ……

पक्षी निरीक्षण करायचं आहे?...... तज्ञ मंडळी सोबत करू….

बोट सफारी करायची आहे?....आम्ही करून देऊ…..(वर दिलेल चित्र सी ए सी  ऑलराउंडर च्या सौजन्याने) 

कॅम्प मध्ये कुटुंबासोबत छान वेळ घालवायचा आहे?..... अगदी तंबू लाऊन जागा तयार आहे…..सुरक्षेसकट !!!

कृषि पर्यटन करायच आहे ? ….. शेतकरी आपली आतुरतेने वाट बघताएत…….

मग वेळ कसला लावताय ??!!

सपर्क करा.......खाली दिलेल्या भ्रमणध्वनि वर ….😀😀



अमित नासेरी

9422145190

                                                                         पुढे सुरू

 

पुढच्या अंकात नागपुरातील ऐतिहासिक आकर्षणा बद्दल जाणून घेऊ…..


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park