मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

 

मध्यंतरी माझे  मित्र अंबरीष घटाटे यांचा  ‘औरा पार्क’  पाहण्याचा योग आला. नागपूर -अमरावती रस्त्यावर, बाजारगाव च्या थोड पुढे उजवीकडे ५ कि. मी  वर कथलाबोडि  गावाला लागूनच हा ‘जैव-संकल्प’ प्रकल्प आहे. 

इथपर्यंत  पोहोचतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला साग वृक्ष आपले सहर्ष स्वागत करतांना उभे असल्याच दृश्य दिसतं. प्रकल्पाच्या आत शिरल्यावर एक वेगळ्याच विश्वात आल्याची जाणीव होते. इथे वेग-वेगळ्या औषधी वनस्पति आणि त्यांचे फायदे समजावून देण्याच मोठ काम अंबरीष आणि त्यांचे सहकारी गेल्या ७  ते ८ वर्षांपासून करताएत.

आता तुम्ही सर्व विचाराल त्यात एवढ 'मोठ' काय ?

औषधी वनस्पति उत्पादन करणारे बरेच आहेत .. तसेच हे सुद्धा असतील….. !!!

मी तस पर्यटन क्षेत्रात काम करणारा व्यक्ति. याच प्रकल्पाच्या जवळच असलेल्या ‘वॉटर पार्क’ मध्ये मी माझ्या ग्राहक मित्रांना व त्यांच्या परिवाराला मजा करायला पाठवल  आहे आणि मी स्वता सुद्धा गेलोय. 

पण त्या वॉटर पार्क पेक्षा या ‘औरा पार्क’ ला मी इथे महत्व का देतोय ??

माझ्या आवडी-निवडी ठराविक आहेत अस माझे घरचे आणि मित्रमंडळींना ठाऊक आहे. पण कधी-कधी काही ‘खास’ अनुभव मला त्याबद्दल लिहायला प्रवृत्त करतात, तसाच हा एक आहे !!!

लोकांची मजा करायची  परिभाषा वेगळी असतेच आणि सेवा देतांना असे कित्येक अनुभव घेऊनच कदाचित माझे विचार पण तसेच झालेत.

पण या परिभाषेला आता खरंच बदलून  टाकाव अस मला वाटतंय !!!

आज माझे ग्राहक मित्र महाराष्ट्रात नागपूर सोबत सोबत मुंबई, पुणे ,नाशिक, कोल्हापूर सगळीकडे आहेत….. 

आपण केलेली मजा काही क्षणापूर्ती आनंद देते अस सर्वांनाच अनुभव आहे ….

मजा करा पण खरंच त्यातून आपल्याला सात्विक आनंद मिळतोय का ?

तुमच्या आणि माझ्या सारख्या असंख्य लोकांना जेव्हां इतर झाडे आणि खास औषधी वनस्पति मधली पाने, फुले, मुळ, फांद्या यांचातला फरक समजावून देणारी, त्याचे आपल्याच  आरोग्यावर होणारे फायदे सांगणारी  व्यक्ति भेटते तेव्हा पूर्ण कहाणी बदलते.

एक अगदी बोलका अनुभव अंबरीष नि सांगितला  …. एकदा एक कुटुंब ‘पार्क’ नावांमुळे इथे आला. त्यांची अपेक्षा होती की इथेही बाजूच्याच वॉटर पार्क सारखं काहीतरी नवीन असणार. आत आल्यावर तस काही न दिसल्याने त्यांची निराश झाली. पण यांच्या टीम मधले सहकारी  यांनी परिस्थिति पाहता त्या कुटुंबाला सोबत घेऊन पूर्ण परिसर फिरवला आणि माहिती दिली. निघतांना ह्याच कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया तिथल्या रजिस्टर मध्ये नोंदवली गेली.

प्रवाहाविरुद्ध पोहणारे  असे श्री अंबरीष आणि त्यांची टीम आहे. अतिशय कळकळीने पण तेवढ्याच मनोरंजक पद्धतीने इथे ‘औरा पार्क’ मध्ये असलेले जवळपास ४०० – ५०० औषधी वनस्पति, झाडे, फुले, त्यांची मुळ या  बद्दल ची माहिती ते देतात.

असाच एक छानसा उपक्रम असलेला ‘नक्षत्र वन’, इथे आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतो... आणि ‘औरा पार्क’ ची खरी ओळख आता तुम्हाला पटायला लागते.   

मला इथे पोहोचल्याबरोब्बर सर्वात आधी  प्रकर्षाने जाणवला  तो होता इथला ह्या सर्व वनस्पतींचा  सुगंध. एका सात्विक वातावरणात असल्याची अनुभूति होईल याची खात्री मीच तुम्हाला देतोय. ‘औरा पार्क’ मधला ‘ ‘औरा टी’ हे इथल ‘वेल्कम ड्रिंक’. तसेच जेवायच्या वेळेस चविष्ट  ‘औरा सूप’ इथलं एक न विसरणार अनुभव. प्रकल्पावर उगणाऱ्या  बऱ्याच औषधी वनस्पतींचा वापर आपल्या कोशिंबीरीत आणि भाजीत  केलेला आहे अस आपल्याला जेवताना लक्षात येत.

काही वनस्पति अगदी संपण्याच्या मार्गावर होत्या त्यांना इथे वाढवण्यात येत आहे.

थोडक्यात इथे आलो, इथे पाई  फिरलो म्हणजे  तब्येत छान होणारच, सोबतच अस सात्विक जेवायला मिळाल की बोलायची गरजच नाही. त्याहून जास्ती इथे प्रत्येक झाडांबद्दलची माहिती आपल्या विचारांना एक वेगळीच दिशा देते.

आपल्यात अनेक जण दगदगिमुळे त्रासले आहेत आणि बरेचसे जीवनशैली मध्ये सुधार, निरोगी आयुष्य व त्यात योग्य  बदल घडवण्यासाठी धडपडताएत. अश्या  सर्वांसाठी हा ‘जैव संकल्प प्रकल्प’  भविष्यात खूप कामात  येणार एवढ नक्कीच.

आपल्याकडे बाहेरून येणाऱ्या पाहुणे मंडळींना हे प्रकल्प आवर्जून दाखवावा कारण येणाऱ्या काळात आयुर्वेदात उपयोगी असणाऱ्या दुर्मिळ वनस्पति कश्या असतात हे पाहणं आणि त्याची माहिती असणं  तुमच्या -आमच्या सारख्या लोकांना आवश्यक झालंय.

नागपूरच्या जवळच एक विशेष पर्यटन पर्याय म्हणून याच महत्व अधिक वाढणार एवढ नक्की. पण हा पर्याय मजा-मस्ती करणाऱ्या ‘सुज्ञ’ पर्यंटकांसाठी नाहीं.   

प्रकल्पावर वेळो-वेळी ‘च्यवनप्राश’ शास्त्रोक्त पद्धतीने कस बनवतात याची कार्यशाळा घेतली जाते.

आज कोविड१९ च्या त्रासदित रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘च्यवनप्राश’ कार्यशाळेला वेगळच महत्व मिळत…..  आणि सद्यपरिस्थितीत मास्क घालून, सामाजिक अंतर ठेऊनच ही कार्यशाळा घेतली जाणार.

येत्या १ नोवेंबेर २०२० अशीच एक कार्यशाळा राहील.

अश्या निसर्गरम्य ठिकाणी कार्यशाळेत भाग घेणं कोणाला नाही आवडणार ??

अमित नासेरी

९४२२१४५१९०


सर्व फोटो ‘औरा पार्क’ च्या फेसबूक पेज वरुन साभार !!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Pure -> Divine ->Holy - > Aura Park

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!