डिसेंबर मधला ‘जोशी वाडीतला’ कृषि पर्यटनाचा बेत !!!
मेलग मॅडम चा फोन ‘अमित आपण एक दुसऱ्याला ओळखतो का?’ मी ‘नाही मॅडम’ मेलग मॅडम ‘मग तुझा सेल नंबर माझ्या जवळ कसा आला ?’ मी ‘ मॅडम निव्वळ योगायोग !!!’ आणि याला मी खरंच एक योगायोग म्हणीन कारण या एका फोन मुळे हडस हाय स्कूल चे माजी विद्यार्थी माझ्या संपर्कात आले !!! अहाहा !!! डिसेंबरचा महिना म्हणजे आपल्या सर्वांसाठी सहलीवर जायचा काळ ..पण या वर्षी कोविद१९ मुळे दूरच्या प्रवासावर निर्बंध घालाव लागलंय. पण त्यामुळे आपण प्रवास किवा सहलीवर बिलकुलच नाहीं जायच अस वाटून सुद्धा चालणार नाहीं.... आपण थोडा वेगळ्या पद्धतीच पर्यटन करूया का? कोणालाही त्रास न होऊ देता ? खूपच ‘रिस्क’ न घेता आपण नागपूरच्या जवळच असलेल्या आज पर्यंतच्या दुर्लक्षित निसर्गरम्य स्थळांना भेट देऊ शकता. जंगलात सफारीचा आनंद घेण ऑक्टोबर पासून शक्य झालेल आहेच. तिथले रिसॉर्ट सरकारी नियम पाळून पर्यटकांची व्यवस्थित काळजी घेत आहेत. इथे अट फक्त एवढीच की एक जबाबदार पर्यटक म्हणून जंगलात राहण आता खूप मोठी गरज झालीय. ह्या दिवसांत आपण छान पैकी कॅम्प मध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता. निसर्गाच्या सान्निध्यात ...