डिसेंबर मधला ‘जोशी वाडीतला’ कृषि पर्यटनाचा बेत !!!


मेलग मॅडम चा फोन  ‘अमित  आपण एक दुसऱ्याला ओळखतो का?’

मी ‘नाही मॅडम’

मेलग मॅडम ‘मग तुझा सेल नंबर माझ्या जवळ कसा आला ?’

मी ‘ मॅडम निव्वळ योगायोग !!!’

आणि याला मी खरंच एक योगायोग म्हणीन कारण या एका फोन मुळे हडस हाय स्कूल चे माजी विद्यार्थी माझ्या संपर्कात आले !!!


अहाहा !!! डिसेंबरचा महिना म्हणजे आपल्या सर्वांसाठी सहलीवर जायचा काळ ..पण या वर्षी कोविद१९ मुळे  दूरच्या  प्रवासावर निर्बंध घालाव लागलंय. पण त्यामुळे आपण प्रवास किवा सहलीवर बिलकुलच नाहीं जायच अस वाटून सुद्धा चालणार नाहीं....

आपण थोडा वेगळ्या पद्धतीच पर्यटन करूया का? कोणालाही त्रास न होऊ देता ?

खूपच ‘रिस्क’ न घेता आपण नागपूरच्या जवळच असलेल्या आज पर्यंतच्या दुर्लक्षित निसर्गरम्य स्थळांना भेट देऊ शकता.

जंगलात सफारीचा आनंद घेण ऑक्टोबर पासून शक्य झालेल आहेच. तिथले रिसॉर्ट सरकारी नियम पाळून पर्यटकांची व्यवस्थित काळजी घेत आहेत. इथे अट फक्त एवढीच की एक जबाबदार पर्यटक म्हणून जंगलात राहण आता खूप मोठी गरज झालीय.

ह्या दिवसांत आपण छान पैकी कॅम्प मध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता. निसर्गाच्या सान्निध्यात  टेंट  मध्ये राहण्याचा हा एक छानसा अनुभव सगळ्यांना आवडतोय. रात्रीच्या वेळेस जेवणानंतर कॅम्प -फायर च्या भोवती किस्से सांगा , गाणी म्हणा, अनुभवी गाइड सोबत रात्रीचा ट्रेक करा .. हे सर्व ‘अनुभव पर्यटन ‘ मध्ये मोडणारे प्रकार.


आजकाल कोणावरही अवलंबून न राहता लोक जेवणाचे डबे घेऊन आप-आपल्या गाड्यांमध्ये कुठल्यातरी तलावाच्या काठावर, जंगलात, निसर्गरम्य स्थळी जाऊन ‘पिकनिक ‘ चा आनंद घेताना दिसतात.  

पण सर्वात महत्त्वाच पर्यटन जे सर्वांनाच पसंद पडेल ते आहे ‘कृषि -पर्यटन’ !!!

नागपूर शहराच्या जवळच असलेले अनेक शेतकरी आणि त्यांची शेतं आज नवीन जोमाने सेवा द्यायला तयार आहेत. 

‘कृषि-पर्यटन’ संकल्पनेमुळे  शेतकऱ्याचा आणि शहरात राहणारे लोक यांच्यात छान समन्वय घडेल एवढ नक्की . या वर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या सहली शेतावर एका उत्सवा सारखं  साजरं केल जाऊ शकतं. अनेक कुटुंब त्यांच्या सोबत असलेले बाल-गोपाल शेतात जाऊन संत्री, पेरू खाऊ शकतात आणि सोबतच चुलीवर तयार केलेलं चविष्ट वांगी भरीत, ओल्या तुरीच्या डाळीची उसळ , झुणका-भाकर खाण्याचा सात्विक आनंद घेऊ शकतात. शेतावर थोडा जास्तच जेवलो अस म्हणणारे तुम्हाला खूप भेटतील...

कृषि पर्यटन चा असाच एक छान अनुभव ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकताच ‘जोशी वाडी’ इथे देण्यात आला.

१९६७ वर्षी दहावी पास झालेली हडस हाई स्कूल ची बॅच माझ्या संपर्कात आली. मेलग मॅडम सोबत फोन वर चर्चा झाल्यावर त्यांचे मुख्य प्रतिनिधी श्री. अजित परूळकर यांची भेट घेतली आणि शेतावरच्या गेट-टुगेदर ची योजना आखली.

सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे श्री परुळकरांना आधी शेत दाखवल. पाई चालण्यालायक जागा, आराम करण्याची जागा अश्या  सर्व सोई पाहिल्यावरच त्यांनी होकार दिला.

गेल्या सात -आठ महिन्यापासून कुठेही जाता आल नाहीं अशी खंत त्यांच्या आणि इतर लोकांच्या मनात होती. सद्य परिस्थितीत कोरोंना असल्याने खूप दूरवर जायची  ‘रिस्क ‘ सुद्धा घेता  येत नव्हती. म्हणून शेत हा एक सर्वात ‘ सेफ ‘ पर्याय म्हणून सर्वांच्या पसंतीस उतरला आणि तेही शहराच्या जवळच.

‘जोशी वाडी ’ चे श्री. श्रीपाद जोशी आणि सौ. धनश्री जोशी सोबत चर्चा करून दिवस ठरवला. रविवार सर्वांच्या सोईचा होता. मुख्य म्हणजे खूप दिवसानंतर ही सर्व मित्र मंडळी भेटत होती.

शेतावर पोहोचल्यावर गरम गरम पोहे  आणि चण्याची तररी ची चव घेऊन  शेतावरच्या सहलीची खरी सुरुवात झाली. नंतर शिवार फेरीत श्रीपाद जोशींनी  शेतावर घेतली जाणारी पिके , फळबाग, मत्स्यपालन, शेळीपालन, औषधी वनस्पती अशी सविस्तर माहिती दिली. शेतावरच्या पेरूच्या झाडांवरून पेरू तोडून खाण्याचा आनंद घेतला आणि नकळत सर्वांनाच आपल्या लहानपणाची आठवण आली.

एकूण दोन तास शेत फिरल्यावर दुपारच्या जेवणाचे  वेध लागले.

आता दुपारच जेवण सुद्धा  खास  चुलीवरच होतं. भाकरी, वांग भरीत, झुणका, पचडी, वांगा- बटाटा रस्सा भाजी, मसाले भात, मिरची ठेचा, मसाला ताक आणि दही अशी मेजवानी होती. धनश्री आणि शेतावरची टीम यांनी जेवणाची बाजू चोख सांभाळली.

जेवण झाल्यावर पथारी मारण्यापेक्षा हौझी , पत्ते खेळणं, गाणी म्हणणं हे सर्व कार्यक्रम झाले…. म्हणजे  मज्जाच मज्जा !!!

दुपारच्या  चहा सोबत तुरीच्या शिजवलेल्या  शेंगा होत्या …..


निघतांना सर्वांनी  शेतावरची पेरू, ताज्या भाज्या घेतल्या …..

परूळकर कुटुंब , डांगे कुटुंब, वर्धा इथले डॉ.लाखकर  कुटुंब सोबत खांडवेकर साहेब, शास्त्री साहेब, किशोर दिवेकर साहेब, प्रदीप खेडकर साहेब ,जोगळेकर मॅडम, मेलग मॅडम, माणिक शिवदे मॅडम आणि ज्योति तेलंग मॅडम या सर्वांचे आभार …. तुमच्या  आनंदात आम्हालाही  सहभागी होता आलं  !!!

एकूण ‘जोशी वाडीतल’ कृषि पर्यटन सुफळ संपूर्ण झालं अस म्हणायला हरकत नाही ……


अमित नासेरी

९४२२१४५१९०

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park