कॅम्प चेरी फार्म रामटेक - भाग १

सर तुम्ही सिंधूरागिरी ट्रेक वर जाणार ??!!!’   

मी ‘हो , आता इतक्या लांब कॅम्प ला आलोय आणि ट्रेक  नाही करणार ??’

वेळ होती रात्री दहा ची...  

जागा होती कॅम्प चेरी फार्म रामटेक  जिथून हा ट्रेक सुरू होणार होता.....

माझ्या आजूबाजूला अगदी युवा मूल-मुली तयारीला लागले होते रात्रीच्या ट्रेक साठी .... 

माझी ट्रेक वर जायची पहिलीच वेळ आणि तुम्हा सर्वांना सांगतो मला हा ट्रेक  अगदी  मनापासून आवडला ….

रामटेक गड मंदिराच्या मागच्या बाजूला करपूर बावडी एक निसर्गरम्य हेमाडपंथी मंदिर परिसर आहे. त्याला लागूनच कॅम्प चेरी फार्म हे आंब्याच्या झाडांनी  नटलेल एक उत्कृष्ट ठिकाण आता लोकांना कळू लागलंय. सर्वात चांगली गोष्ट इथे येणाऱ्यांना प्रवेश ‘आमंत्रण’ असल्या शिवाय नाही. म्हणजेच मस्ती आणि टवाळखोरी  करणारी गॅंग इथे प्रतिबंधित आहे  !!!

कॅम्प मध्ये आल्यावर  इथल सकारात्मक ऊर्जा असलेलं  वातावरण तुम्हाला भुरळ पाडत. पावसाळ्यात असो किवा हिवाळ्यात, इथला  हिरवागार परिसर या कॅम्पच्या  जमेची  बाजू. कॅम्प मधून तुम्हाला पलीकडचा दाट जंगल आणि त्याच्या अजुन पलीकडे वर गड मंदिर दिसेल. एकूणच कॅम्प चेरी फार्मचा ‘लँड-स्केप’ तुम्हांला प्रफुल्लित केल्याशिवाय राहणार नाहीं.



पण कॅम्प चेरी फार्म आहे तरी काय ?

कदाचित ही जागा  तुम्हाला प्रकृतीच्या सान्निध्यात वेळ घालवायचा  एक पर्याय म्हणून वाटत असेल.

हे एका  अर्थी बरोबर असेलही ….. पण आपल्याकडे जंगलात असे खूप रिसॉर्ट आहेत ??!!!

मग ह्या जागेला इतरांपेक्षा जास्ती महत्व का बर द्यायच?

मी काही मोजक्या शब्दात कॅम्प चेरी फार्म  बद्दल सांगतो …..

ही जागा रिसॉर्ट म्हणायच्या पठडीत बसंत नाहीं म्हणूनच  हीच वेगळेपण सांगणारे काही महत्वाचे  बिंदु ….

  • इथे सौम्य साहसिक खेळांची मजा घेतां येते
  • ह्या खेळांना अगदी हसतमुखाने तसेच सुरक्षित  पद्धतीने करवणारी  प्रशिक्षित चमु  आहे
  • राहण्यासाठी डोरमिटोरी  आहेच पण सर्वात जास्ती  मजा टेंट मध्ये राहून घेतां येत
  • सुरक्षित वातावरण असल्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक सर्वच खुश असतात
  • टॉयलेट बाथरूम आणि पाण्याची सोय आहे (थंडीत गरम पाण्यासकट)
  • निसर्गरम्य परिसर सर्व कुटुंबीयांच्या पसंतीस उतरतो
  • इथल चविष्ट मराठमोळ जेवण सर्वांनाच आवडत
  • एकदा जो इथला आनंद घेतो  तो परत येतो आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा सोबत आणतो
  • कॅम्प साइटच्या जवळ छोटे ट्रेक करायला  खूप वाव आहे …. तुम्ही करपूर बावडीला जा, अगदी खिंडसीच्या तलाव पर्यन्त जा, खिंडसीला सूर्योदय पाहण एक छान अनुभव आहे, अनुभवी व्यक्ति सोबत रात्री जंगलात ट्रेक सुद्धा करू शकता
  • नुसतं झाडाखाली बसून गप्पा मारणं इथेच होऊ शकत ( झाडाखाली झोप सुद्धा छान लागते)
  • रात्री टेलेस्कोप मधून ग्रह, तारे पाहण इथे चांगलं जमेल
  • खिंडसी तलावाच्या जवळ पक्षी निरीक्षण करू शकता


गेल्या काही महिन्यांपासून कोविद१९ चा त्रास मुळे सर्वच हैराण आहेत. बरीच कुटुंब शहरापासून खूप लांब न जाता कॅम्प चेरी फार्म ला येण पसंत करताएत. त्या मागच एकच कारण आहे इथलं अनुशासन. तुम्ही कोविद काळात स्वताला आणि इतरांना सुरक्षित ठेऊन इथे खात्रीलायक आनंद घेऊ शकता.


प्रत्येक कुटुंबाला ठरलेली वेगळी जागा दिली जाते आणि जेवतांना सुद्धा काळजी घेतली जाते.

मी गेल्या काही महिन्यांपासून कॅम्प चेरी फार्म बद्दल थोडं फार लिहिल आहे पण स्वत जाऊन अनुभव घेण्याची वेळ गेल्या  आठवड्यात आली. निमित्त होत मूनलाइट ट्रेकच. माझ्या सोबत माझा  मित्र प्रसाद वैषमपायन सुद्धा होता. आम्ही बाइक वरच कॅम्प चेरी फार्म ला  पोहोचलो. नंतर करपूर बावडीचा ट्रेक, कॅम्प साइट वर फिरणं, नंतर संध्याकाळी खिंडसी तलावा जवळ पक्षी निरीक्षणाला गेलो. सोबत दुर्बिण असल्याने छान वाटलं. त्या दुर्बिणीमुळे  आम्हाला तलावा पलीकडचे काळवीट पाहता आले.

रात्री जेवण झाल्यावर सिंधूरागिरी ट्रेक वर जातांना मुल-मुलींचा उत्साह पाहण्यासारखा होता. एकूण १६ कि. मि च्या ट्रेक ला पूर्ण करायला ५ ते ६ तास लागणार होते आणि तो सर्वानी केल सुद्धा. रात्री १०.३० ला आम्ही निघालो आणि पहाटे ५ वाजता परतलो. त्या ट्रेक बद्दलचा अनुभव येत्या भागात सविस्तर लिहीन कारण हा माझा पहिलाच अनुभव होता.

कुठलाही  प्रकल्प चालवतांना एक प्रशिक्षित चमु लागते.  कॅम्प चेरी फार्म हे ‘अनुभव पर्यटन’ ह्या अतिशय नाजुक विषयाला अनुसरून आहे. अश्या ठिकाणी  प्रशिक्षित चमु असणे बंधनकारक  आहे. अमोल खंते आणि सोबत त्यांचे सहकारी  गजानन रिंद्धे, अजय गायकवाड, मनीष मख, शिरीष देशमुख व इतर मंडळी यांनी या प्रकल्पाला एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून समोर आणल आहे.  



रामटेक मधल्या  कॅम्प चेरी फार्म प्रकल्पाला भेट द्यायची असल्यास त्यांच्या नागपुरातील  

‘विष्णुजी की रसोई’ मध्ये असलेल्या कार्यालयात बुकिंग देऊ शकता !!!

ह्या प्रकल्पाच्या संकल्पनेबद्दल अजून बरंच  काही सांगण्यासारख आहे ….. ते आता पुढच्या भागात !!!


अमित नासेरी

९४२२१४५१९०

 



Comments

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park