कॅम्प चेरी फार्म रामटेक - भाग २

 तुम्ही हा लेख वाचाल त्या अगोदर हे छान गाण पहा 👌😀


थोडक्यात ‘जो बात इस  जगह है कहीं पर नहीं ‘ …. अगदी हेच शब्द कॅम्प चेरी फार्म साठी लागू होतात ….


एकूण कॅम्प चेरी फार्म ची जादू सर्व सहभागी मंडळींवर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिसत होती. प्रत्येक जण हसत-खिदळत कॅम्प मधल्या रोप-कोर्स, ऑब्सटाकल कोर्स, झुले, आर्टिफिश्यल वॉल चा अनुभव घेत होते… या जागेत आल्यावर कोणी सुद्धा तोंड  लटकवून नाहीं बसणार ह्याची गॅरंटी !!!

प्रसन्न वातावरण ठेवण्याच पूर्ण श्रेय  अर्थातच ‘टीम’ कॅम्प चेरी फार्म ला  !!!


कॅम्प चेरी फार्म ला का बरं जाव ?

  • एक ‘हट के‘ अनुभव घेण्यास
  • तुम्ही प्रकृतीच्या सान्निध्यात येतां आणि त्याचा मनसोक्त आनंद घेता
  • नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच धाडस आपण इथे करता
  • लहानांपासून ते  वयस्कर लोकांना आवडतील असे मनोरंजक कार्यक्रम
  • चविष्ट महाराष्ट्रियन जेवण
  • एकदम सुरक्षित राहण !!!

अमोल खंते यांचा दांडगा अनुभव म्हणतो ‘ जेव्हां एक कुटुंब आपल्या मुलांना घेऊन इथे टेंट मध्ये राहतात, जंगल फिरतात, ट्रेक करतात तर न नकळत ते एका 'थेरेपी'चा लाभ घेतात.  इथले सकारात्मक अनुभव त्यांच्यातले संबंध प्रगाढ करण्यात मदद करतात.’

ते खर सुद्धा आहे….   तुम्ही घरच्यांसोबत नेहेमीच टेंट मध्ये राहता का ??

गेल्या मार्च पासून कोविड मुळे सर्वच पालक हैराण होते. ऑक्टोबर पासून कॅम्प मध्ये विविध कार्यक्रम आणि रात्रीचे ट्रेक मध्ये सहभागी होणाऱ्या  लोकांची  संख्या आणि त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. अनेक कुटुंब  आपल्या मुलांसोबत  कॅम्प मध्ये राहण पसंत करताएत.

ह्याची प्रचिती मला सुद्धा आली जेव्हां मी स्वतः अनेक कुटुंबांना इथे रात्रीच्या  कॅम्प-फायर च्या वेळेस गाणी गातांना पाहिलं. एक २० जणांचा गट तर रात्रभर मजा करत होता…. बहुदा ते याच तयारीनी आले होते.

कोविडच्या काळात  लोक कंटाळलेली आहेत हा अनुभव आम्ही सर्वच पर्यटन व्यवसायी पाहत आहो . अश्या वेळेस  कॅम्प चेरी फार्म  सर्वांसाठी संजीवनीच काम करताएत.


काही  बोलके  अनुभव ..

  • संध्याकाळी  खिंडसी तलावाच्या दिशेने फेरफटका मारताना अनेक पक्षी दिसले. सोबत दुर्बिण असल्याने दूर तलावा पलीकडचे काळवीट चरतांना दिसले.
  • इथे टेलेस्कोप सुद्धा आहे आणि रात्री ग्रह-तारे निरीक्षण करण्यासाठी त्याच्या भोवती लहान मुलांचा गराडा पाहून छान वाटलं.
  • दुपारच आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेस कराओके वर गाणी गायला अगदी लहानांपासून ते मोठ्यांमध्ये चाढाओढ दिसली
  • जेवण-नाश्ता बुफे पद्धतीचा आहे आणि अगदी आपुलकीने सर्वांची विचारपूस घेत कॅम्प चेरी फार्म टीम गरम गरम चविष्ट पदार्थ ‘सर्व’ करतांना दिसतात

सिंधूरागिरी ट्रेक

गमतीचा भाग असा की मी कॅम्प मध्ये यायच्या अगोदर कधीच ट्रेक केलेला नव्हता म्हणूनच मी होकार दिल्याबरोबर टीम ला थोड विचित्र वाटलं ( त्यांची प्रतिक्रिया पाहुन मला असच वाटलं). चांगलाच मोठा ग्रुप जमला होता. ७० -८० लोक  १५ - ३५ अश्या वयोगटातली होती. म्हणजे सहभागी होणारा मी सर्वात ‘सीनियर’ आणि माझ्या नंतर प्रसाद हा दूसरा सीनियर  !!!

कॅम्प वरुन  करपूर बावडी च्या मागून पहाडी चढून त्रिविक्रम मंदिर आणि तिथून पुढे अंबाळा  तलावाच्या मागची पहाडी चालत जाऊन नागारजुन मंदिर पर्यन्त आणि मग पुढे खिंडसी तलावाच्या डॅम वर उतरायच. मग खिंडसी च्या काठावरुन  चालत कॅम्प कडे यायच होतं. तसा १६ कि. मि. चा हा ट्रेक राहणार अस अमोल सरांनी सांगितलं.

रास्ता जंगल मधुन, दगड गोटे असलेला चढ उतारा सकट  राहणार अस आधीच सांगितलं गेल. एक लीडर समोर आणि त्याच्या मागे एका लायनीत रात्री साढे दहा ला सर्व जण निघाले.

तो ट्रेक कसा होता ? किती कठीण होता ?.... या चर्चेत न जाता मला ज्या  सकारात्मक गोष्टी दिसल्या त्यावरच इथे  लक्ष देईन …..

  • सहभागी झालेल्या सर्व युवा मुल मुली ट्रेक पूर्ण करून कॅम्प ला सकाळी ५ वाजता सुखरूप पोहोचले
  • बरेच लोक फॅशन म्हणून आले होते अस पहिल्या चढ चढतांना माझ्या  लक्षात आल होतं पण एकदा वर जंगलातून चालण सुरू झाल्यावर सर्वच जिद्दीवर आले.
  • चंद्र प्रकाशात टॉर्च ची गरज नाहीं भासली पण चांगले बूट घालून सुद्धा पायांची काय हालत होऊ शकते हे या ट्रेक मुळे कळलं.
  • पहिल्यांदा ट्रेक  करणारे माझ्यासारखे अनेक होते  त्यामुळे  काही जणांना हा ट्रेक कठीण वाटला पण फक्त मनातल्या जिद्द मुळे त्यांनी हा पूर्ण केला.
  • चालताना पाणी सांभाळून प्लान करून प्यावे.
  • मधुन मधुन ब्रेक घेत समोर जाण आणि वेळेच पालन करण फारच महत्त्वाच आहे.
  • कोणी रस्त्यात राहील तर नाहीं याची काळजी सर्वच घेतांना दिसले
  • ट्रेक तुमच्यात संयम वाढवतो आणि मानसिकदृष्ट्या बळकट करतो
  • तुमच्या स्वभावात शिस्त असेल तर अश्या  ट्रेक वर इतरांना तुम्ही सांभाळून घेत पूर्ण केल्यामुळे  समाधानी असता.
  • मुलींनी थकून भागून हा ट्रेक पूर्ण केला तो फक्त त्यांच्या  जिद्द मुळे
  • चढण्यापेक्षा पहाडी उतरतांना जास्ती काळजी घ्यावी लागते आणि ते सर्वांनी व्यवस्थित केलं.
  • रात्रीचा ट्रेक आहे त्यामुळे काळजी घेऊन आणि एक टीम म्हणून सर्वांचा उत्साह वाढवत पुढे नेण महत्त्वाच ठरत.
  • खरी कसरत होती ती  खिंडसी तलावाला लागून असलेल्या खडकाळ रास्ता ओलांडण….. पण तो सुद्धा  हळू हळू वाट काढत सर्वांनी पूर्ण केला.

तुमच्या लक्षात आल असणार .. मी वर जिद्द हा शब्द खूपदा वापरलाय आणि तोच हा ट्रेक पूर्ण करण्यास कारणीभूत आहे.     

गेल्या कोजागिरी पासून कॅम्प चेरी फार्म दर  महिन्यात  पौर्णिमेला हा ट्रेक आयोजित करतात. हा ट्रेक तेव्हां  पासून खूपच ‘ हिट’ झालाय.

हा अनुभव घेतल्यावर मी  सर्व उत्साही लोकांना या ट्रेक मध्ये सहभागी व्हाच अस म्हणीन.

अनेक  अनोळखी सहभागी या ट्रेक मुळे माझे मित्र बनलेत.


आता पुढच ट्रेक कुठला आणि कुठे याची चर्चा सुद्धा सुरू  झालीय !!!

येणाऱ्या काळात कॅम्प चेरी फार्म नवीन कार्यक्रम घेऊन समोर येणार  त्याबद्दल सांगीनच ..

अमित नासेरी

९४२२१४५१९०

Comments

  1. Wonderful experience,tempting to explore personally.. will definitely plan..

    ReplyDelete
  2. खूपच मस्त , हे वाचल्यावर मी पण ठरवलय पुढच्या पौर्णिमेला मी जाणारच .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park