कॅरव्हॅन पर्यटन
कॅरव्हॅन पर्यटन कोविड१९ नंतर प्रवास - पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील आव्हानात एक पर्याय म्हणून समोर येत आहे !! जवळपास दीड वर्षापासून आपण सर्वच प्रवासाला मुकलोय . सद्य परिस्थितीत ' रीव्हेंज टुरिजम ' हा शब्द बऱ्याचवेळेस ऐकायला येतोय . आता कोणतीही आपदा आली तरी आम्ही फिरायला जाणारच असेच काहीतरी सर्वांच्या मनात आलंय . काहीही असो , लोकांना लवकरात लवकर त्यांच्या आवडत्या ठिकाणी प्रवास करायचा आहे तर त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहेच . सर्वप्रथम पर्याय म्हणून , रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत जे आराम देतात आणि पाहुण्यांना इथे सुरक्षित सुद्धा वाटतं . साथीच्या काळात प्रत्येकजण आदरणीय पाहुण्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत आहे . खोली सेनिटाइज केल्याशिवाय चेक - इन होत नाहीं . तुम्ही खोली चेक - आउट केल्यावर लगेच सेनिटाइज केली जाते . घराबाहेर निसर्गात राहून आनंद घेण्याचे महत्व आता चांगलच वाढलंय . तसेही लोक त्यांच्या कार किंवा एसयूव्हीमध्ये रोड ट्रिपवर जातील आणि त्यांना हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहाव लागेल . आत्ताच आरोग्याच्या चिंतेमुळे ते टाळू शकतात… . सध्या तरी !!! थोडक्यात...