कॅरव्हॅन पर्यटन
कॅरव्हॅन पर्यटन
कोविड१९ नंतर प्रवास- पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील आव्हानात एक पर्याय म्हणून समोर येत आहे !!
जवळपास दीड वर्षापासून आपण सर्वच प्रवासाला मुकलोय. सद्य परिस्थितीत' रीव्हेंज टुरिजम' हा शब्द बऱ्याचवेळेस ऐकायला येतोय. आता कोणतीही आपदा आली तरी आम्ही फिरायला जाणारच असेच काहीतरी सर्वांच्या मनात आलंय.
काहीही
असो,
लोकांना लवकरात
लवकर त्यांच्या आवडत्या ठिकाणी
प्रवास करायचा आहे तर
त्यांनी काळजी घेणे आवश्यक
आहेच.
सर्वप्रथम
पर्याय म्हणून,
रिसॉर्ट्स
आणि हॉटेल्सआहेत जे
आराम देतात आणि पाहुण्यांना
इथे सुरक्षित सुद्धा वाटतं.
साथीच्या
काळात प्रत्येकजण आदरणीय
पाहुण्यांच्या आरोग्याची
आणि स्वच्छतेची काळजी घेत
आहे. खोली
सेनिटाइज केल्याशिवाय चेक-इन
होत नाहीं.
तुम्ही
खोली चेक-आउट
केल्यावर लगेच सेनिटाइज केली
जाते.
घराबाहेर
निसर्गातराहून आनंद
घेण्याचे महत्व आता चांगलच
वाढलंय.
तसेही
लोक त्यांच्या कार किंवा
एसयूव्हीमध्ये रोड ट्रिपवर
जातील आणि त्यांना
हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये
राहाव लागेल.
आत्ताच आरोग्याच्या
चिंतेमुळे ते टाळू शकतात…
.सध्या
तरी !!!
थोडक्यात पाहुण्यांना..
१
. प्रवास
करायचाच आहे ...
२.
एखाद्या पर्यटन
स्थळावर निवांत वाटेल अश्या
ठिकाणी आराम करायचय ....
३.
आपल्या मर्जीने
आनंद घ्यायचय ….
४
. निसर्गात
रमायचे आहे...
५.
निरोगी आणि चवदार
अन्न खायचय ......
६.
निवासस्थान स्वच्छ
पाहिजे अशी इच्छा आहे …….
७
.त्यांना
संसर्गापासून दूर राहायचय
आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना
त्रास होऊ नये अशी इच्छा
८.
सर्वात महत्त्वाचा
.. एक
त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव
हवा !!!!
यात
अजुन एक पर्याय समोर येत आहे.
जणू तो
या साथीचीच वाट पाहत होतं अस
म्हणायला हरकत नाहीं.
गर्दी
पासून लांब राहून तुम्ही
तुमच्या सुटीचा आनंद घेऊ शकता.
तो पर्याय
आहे 'कॅरव्हॅन'
किवा
'मोटर
होम' !!
आता
वादविवाद होण्यापूर्वी,
मला मुद्दा
स्पष्ट करू द्या… .
हॉटेल आणि कॅरव्हॅन या दोघांमधला फरक आहे आणि तो
म्हणजे 'अनुभव'
!!!
तुम्हाला निसर्गात राहण्याचा आनंद घेता येतो....
तुमच्या मनाला आवडणाऱ्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही ही 'मोटर होम ' उभी करू शकता.
कॅरेवन मध्ये राहण तुम्हाला ते स्वातंत्र्य आणि लवचिकतादेतं. यातस्वयंपाक भांडी, गॅस/स्टोव्ह आणि किराणा मालासहतुम्ही प्रवास करू शकता. या शिवाय लोकप्रिय म्हटले जाते ते संगीत प्रणाली, रेडिओ, टीव्ही, टॉयलेट, वॉश बेसिन आणि शॉवरसह बाथरूम आहेत. काही वाहने कॅम्पिंग गिअर्स, खुर्च्या, हॅमॉकसह सुसज्ज असतात . कॅरव्हॅन स्वयंपूर्ण जागेसह येतात आणि आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध असते .शिवाय वेळापत्रकाची लवचिकता आपल्या हातात आहे.
तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याशिवाय कोणीच नसल्यामुळे याच्याकडे एक पूर्ण वैयक्तिक सुट्टी मनवण्याचा अति-उत्तम साधन म्हणून बघाव.
एक गोष्ट नक्की - तुम्ही ठरवल्याप्रमाणे न गेल्यास तुम्हाला अधिक आनंद होईल !!!
अश्या गाड्याभाड्याने पुरवणाऱ्या स्टार्ट अप कंपन्या समोर येत आहेत. साधारणपणेअश्या सेवा देतांना गाडी
सोबत चालक आणि मदतनीस यांचा समावेश असतो.
या कोविड काळात तुम्हाला सेनिटाइज केलेल्या मोटर होम मिळतीलच. कंपन्यांकडे गाड्यांची पार्किंग आणि त्याच्या पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी आधीच चिन्हांकित जागा आहेत. पार्किंगची किंमत प्रत्यक्षात हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहण्यापेक्षा कमी आहे.
घरापासून दूर तुमचा मिनी-होम बनतो हा कॅरव्हॅन !!!
कुटुंबांनी
एक दुसऱ्या सोबत अधिक वेळ
घालावा या मागचा उद्देश्य.
कारण याच
आठवणी सर्वात महत्त्वाच्या
ठरणार आहेत.
तुम्ही
एकत्र स्वयंपाक करता,
एकत्र रहात
असतांना मजा करता ,
गाणी
म्हणता,
आजूबाजूच्या
निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता
.
आपल्या मध्य क्षेत्रात असंख्यनिसर्गरम्य ठिकाण आहेत. ग्रामीण, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणं आणि तीर्थक्षेत्रआहेत.आपल्याकडे हिल स्टेशन देखील आहेत जिथे कुटुंब आनंद घेऊ शकतात !!
लोकांचा
अनुभव पाहता अस म्हणायला
हरकत नाहीं कि अनियोजित
आणि अनिश्चित वेळापत्रक अधिक
आनंद देतो ....
फक्त
एकदा करून बघा ...
.. रस्ते वाट पाहत
आहेत ...
तुम्ही
निराश होणार नाही याची
गॅरंटी !!
अमित नासेरी
९४२२१४५१९०
खूपच सुन्दर
ReplyDelete