चेरी फार्म मधला 'पैसा वसूल' अनुभव !!

कधी कधी गंमत म्हणून फिरायला जाण्याची योजना खरंच घडून आल्यावर त्या आनंदाला काही तोडच नाहीं.

फोटो  रवी गांजरे 
आपण फक्त योजनाच बनवत असतो आणि बऱ्याचदा काही अपरिहार्य कारणांमुळे ती ट्रीप टाळावी लागते. पण या वेळेस सर्व छान जमून आल्यामुळे ट्रीप ची मजा आम्हा सर्व मित्रांना घेता आली.

आमच्या रामनगर स्थित जीओ मित्र ऑफिस मध्ये विविध स्टार्टअप आहेत. त्यात शिक्षण क्षेत्र, सोलर, वेब डिझाईन, पर्यटन, रोबोटिक्स आणि सोबतच एन.जी.. सुद्धा आहेत. फिरण्याचा कार्यक्रम बनवायचा योग यांच्या उत्साहामुळे जमून आला असं म्हणायला काहीही हरकत नाहीं. जागा सुद्धा ठरली !! चेरी फार्म !!

रामटेक गडाच्या मागच्या भागात असलेले 'चेरी फार्म' वरचे माझे अनुभव मी यापूर्वी सुद्धा आपल्यासोबत शेअर केलेत. या वेळेस थोडंसं वेगळं अनुभव घेण्याच ठरलं.

फोटो अनायशा 
पहिला अनुभव- कॅम्पच्या जवळच खिंडसी पर्यन्त रात्रीचा ट्रेक आणि तिथेच तलावाच्या काठी बसून शांतपणे चंद्रोदय पाहणं. हे इथे तुम्हाला वाचतांना अगदी साध वाटतं असेल पण माझ्या समोरच्या मंडळीना काहीही न बोलता तलावात तरंगत असलेलं चंद्राच्या उजेडात स्वताला हरवतांना मी पाहिलं. सोबतच पाण्याच्या लाटांना ऐकत या सर्वांना ध्यानस्थ होतांना सुद्धा बघितलं. मनातल्या मनात मी म्हंटल

' यार ये तो कमाल हो गया !!' पुढचे दोन तास किस्से- कहाण्या सांगत ऐकत कसे गेले हे कोणालाच कळलं नाहीं. 'एन्जॉईंग द मोमेंट' बस एवढंच म्हणायच आहे !!

या वेळेस पाऊस चांगलाच झाला आहे आणि खिंडसी तलावात पाणी बरंच आहे. ज्याचा पहिला फायदा आम्ही सर्वांनीच रात्री घेतला.

फोटो सोनल 

दूसरा अनुभव - आता रात्रीच्या अनुभवावरून उत्साह वाढला होताच मग दिवसा त्याच ठिकाणी 'कायाकिंग' ची मजा सुद्धा घेण्याचं ठरलं. तुम्ही चेरी फार्म मध्ये असतांना बऱ्याच सॉफ्ट एडव्हेंचर अॅक्टिविटी करू शकता. 'कायाकिंग' ही कॅम्प च्या बाहेर घेतली जाणारी अॅक्टिविटी. ती सुद्धा तुमच्या सुरक्षेची काळजी घेऊन. सुरक्षा जॅकेट घालूनच ही अॅक्टिविटी केली जाते. तलावाच्याकाठी काही भागात पाणी खोल नाही. तिथेच सर्वांनी कायाक चा आनंद सर्वांनी घेतला आणि नंतर पाण्यात जल क्रिडेचा सुद्धा!!



फोटो सपना पाटील 
खूप दिवसांपासून कामात गर्क असल्यामुळे सर्वांनीच ठरवलेल होतं कि यंदा ब्रेक घेऊन कॅम्प मध्ये गेलं कि रात्री कोणी झोपणार नाहीं आणि छान कॅम्प फायर चा आनंद घेत गप्पा-गोष्टी नाच-गाणी करत म्हणत वीकएंड घालवायचा. असं म्हणायला हरकत नाहीं कि ही योजना शंभर टक्के यशस्वी झाली !!


फूल पैसा वसूल ट्रीप झाली !! 

फोटो  सपना पाटील 

आता येणारे नोवेंबर डिसेंबर महिन्यात असाच आनंद सर्वांना घेता येईल !!


अमित नासेरी 

९४२२१४५१९० 

Comments

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park

Camp Cherry Farm, Ramtek - Part 1