बॅंकॉक मधल्या वॉटर टॅक्सीचा प्रवास....
मी आज एक व्हिडियो शेअर करतोय. मागल्या वर्षी बँकॉक मध्ये असताना मी ग्रुप सोबत 'आल सीझन' मध्ये थांबलो होतो. अगदी साधं अस हॉटेल आहे. योग असा आला की ग्रुप बस मधून सफारी वर्ल्डला स्थानिक गाईड सोबत गेला....एक जोडपं तब्येत बरी नसल्याने हॉटेल वर थांबला.....त्यामुळे मला सुद्धा थांबावं लागलं. अस ठरल की त्यांना बर वाटल की दुपारी २वाजेपर्यंत मी त्यांना सुकूमवित ला आणीन. तिथंच ग्रुप ३ पर्यंत पोहचेल. शॉपिंग साठी...
१ वाजेपर्यंत त्यांना मी फोन केला ....हे जोडपं देशपांडे कुटुंब कानडी होते.... बँग्लोरचे....बर वाटतयं म्हणून त्यांनी सांगितलं...आम्ही लॉबी मध्ये भेटलो. टॅक्सी करायची म्हणून मी काउंटर पाशी व्यक्तीला विचारलं. कुठे जाणार त्याचा मला उलट प्रश्न....मी म्हंटले सूकूमवित....आता त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं हे मी तुम्हा सर्वासाठी शेअर करतोय.....
तो म्हणे टॅक्सी कशाला करता ?....त्यापेक्षा तुम्ही वॉटर टॅक्सी करा...आपल्या हॉटेलच्या बाजूला त्याच स्टेशन आहे तुम्ही टॅक्सी पेक्षा लौकर पोहचाल.....बँकॉक शहरात खुपसारे कॅनाल आहेत हे मला माहिती होत....पण त्यात टॅक्सी चालते हे माझ्यासाठी नवीन होतं....त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही तिघे बाहेर येऊन ते स्टेशन हूडकुन काढलं....अगदी थोड्याच वेळात ही वॉटर टॅक्सी आली.....आम्ही त्यात चढलो.....ही बोट सुरू झाल्यावर तिकीट कुठे आणि कस असा विचार करत असताना एक माणूस कुठून तरी प्रकटला... अस लक्षात आलं की हाच तिकीट देतो.... ४५ बहत म्हणजे १०० रुपयेच समजा....जेमतेम १५ मिनिटात आम्ही पोहोचलो......वेळ वाचला ....आणि खर्च सुद्धा.....त्या व्हिडिओ मध्ये बाहेर बोटीवर लटकलेला तो तिकीट चेकर दिसेलच....
अमित नासेरी
Chhan
ReplyDeleteछान अनुभव ! Joy ride for you ! Water taxi travel, nice initiative by Thai govt to create new jobs, simultaneously providing joy ride to all passegers !
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete