कोरल आयलँड सहल




मित्रांनो,

आज अजून एका  छोट्या प्रवासा बद्दल. 

पत्तायाला असतांना तुम्ही सर्वात आधी अर्ध्या दिवसाचा कोरल आयलँड टूर करता. 

हॉटेल वरून निघायची वेळ अंदाजे 8.30 वाजताची असते. 

सर्वांना हॉटेल वरून टॉवेल देण्यात येतात. तुम्ही ओले होणार म्हणून याची पूर्वतय्यारी. 
समजा टॉवेल  हारवला तर फाइन बसणार अशी ताकीद दिली जाते.

बूट/चप्पल न घालता आपल्या स्लीपर चपला घेणं कधी पण चांगलं. मी आता किती तरी वेळेस बीच वर गेलो आहे म्हणून माझ्याजवळ एक जोडी स्लीपर बॅग मधेच ठेवलेली  असतेच. 

तुम्हाला बस/टॅक्सी हॉटेल वरून घेते  आणि बीच वर आणून सोडते. बीचपाशी तुमचा स्थानिक गाइड स्पीड बोट जवळ नेतो. त्या अगोदर तिथे फोटो घेणारे टपूनच असतात. तसेच स्लीपर चपला विकणारे सुद्धा असतातच.

बीच वर फोटो घेण्याचे सोपस्कार झाल्यावर तुम्ही बोटीपाशी एका लाईनीत जाता. आजच्या दिवसा साठी तुम्ही  टी शर्ट-हाफ पॅंट घातलेली एकदम उत्तम. मुलींनी / बायकांनी  बीचवर  घालण्यासाठी सलवार-कमीझ एकदम छान राहील. थोडक्यात आज कपडे ओले होणार याची तयारी ठेवा. आपल्या सामानाची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. 
सर्वजण स्पीडबोट मध्ये बसल्यावर थोडश्या अंतरावर असलेल्या पोनटून वर पोहोचतात. 
स्पीडबोटचा वेग त्रासदायक आहे. काहींना मळमळ होईल. त्यामुळे काळजी घ्या.



पहिली स्टेज -

 इथे आपण पॅरा-सैलिंग करता.  इथे समजवणारे बरेचसे गाइड आपल्या भारतातून आलेले आहेत. त्यामुळे हिन्दी बोलण्याचा काहीही त्रास नाही. लोकांच्या उत्साहावर अवलंबून आहे . आधी काही जण घाबरतात पण माझ्या अनुभवाने हेच लोकं सर्वात जास्ती मजा घेतांना दिसलेत. पॅरासेल करायचा खर्च वेगळा असतो. ज्यांना नाही करायचा ते गम्मत पाहतात. 1 तास इथे लागतोच.
 


दूसरी स्टेज -
परत स्पीडबोटीमध्ये बसून सर्वजण अंदाजे दहा-पंधरा मिनिटात सी वॉकिंग साठी दूसर्‍या बोटीवर पोहोचतात. 
ज्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायच आहे त्यांना आधीच विचारलेल असतं. ज्यांना नाही करायच ते बोटीवरच थांबतात. इथली सी वॉक ची किम्मत वेगळी लागते. 

तीसरी स्टेज -
आता तुम्ही कोरल आयलँड ला पोहोचता आणि पुर्णपणे बीचचा आनंद घेण्यासाठी मोकळे  असता. अंदाजे दीड तास इथे दिला जातो. इथल्या समुद्राचा रंग थोडा हिरवा-नीळा आहे. त्यामुळे इथले फोटो खूपच छान येतात. इथे किम्मत देऊन बनाना बोट आणि वॉटर स्कूटरचा आनंद घेता येतो. 
माझ्या अनुभवाप्रमाणे  सर्वात जास्ती  मजा इथेच येते. समुद्र खोल नसल्याने पाण्यात मस्ती करा, खेळा,  उडया मारा....... आपल लहानपण आठवेल इतकी मजा या ठिकाणी सर्वांना घेतांना मी पहिलं आहे.
या ठिकाणी नारळपाणी आणि इतर पेय पदार्थ मिळतात. स्थानिक अन्नपदार्थाचा आनंद सुद्धा इथे घेता येतो. 

परतीचा प्रवास अंदाजे अर्ध्या तासाचा आहे. जस मी आधीच सांगितलं स्पीड बोटचे झटके हे त्रासदायक आहेत. लोकांना मळमळ होऊ शकते. तरीसुद्धा हा प्रवास एक छान आठवण म्हणून सर्वांना लक्षात राहतो.   

हॉटेल कडून आणलेले टॉवेल आपल्याला खूप कामात येतात. परत बीच वर आल्यावर ज्याचे फोटो घेतलेत त्यांना छान फ्रेम सकट दिले जातात. पण किम्मत देऊन.....  किम्मत किती आहे हे  आधीच विचारून फोटो करता तयारी दाखवायची. ऐन वेळेत फजिती नको !!!

साधारण  दुपारी दीड ते दोन  पर्यन्त हॉटेल वर आपण पोहोचतो. टॉवेल परत करण हे महत्वाच काम. 


अमित नासेरी


Comments

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park