आहार संस्कृति पर्यटन - एक महत्वाचा दुवा !!!
अन्न हे पूर्णब्रम्ह !!!
कुठल्याही
पर्यटन स्थळाची ओळख – देश असो परदेश असो.. तिथे मिळणाऱ्या जेवणामुळे जास्त लक्षात राहत. मी भारतात फिरस्ती वर असतांना भूक लागली की
कुठल्यातरी खानावळीत जेवतो. अगदीच बजेट व्यवस्थित असेल तर थोड चांगल्या रेस्टोरंट
मध्ये जेवणाचा आनंद सुद्धा घेतो. मला
स्थानिक व्यंजनाचा आस्वाद घेता येईल या
महत्वाच्या विषयाकडे आवर्जून लक्ष देतो.
टुर
मॅनेजर म्हणून ग्रुप सोबत असतांना थायलंड, मलेशिया आणि सिंगापुर मध्ये भारतीय
रेस्टोरंट मध्येच जेवायच असा प्रकार माझ्या पूर्वीच्या कंपनीत व्हायचा. पण ते एक साचेबद्ध काम होत. त्यावेळेस मला काही
पाहुणे म्हणाले सुद्धा की आम्हाला स्थानीक जेवण एकदा तरी चालेल. मला निश्चितच ही एक कौतुकाची बाब वाटायची. तसा फीडबॅक मी
माझ्या कंपनीला दिल सुद्धा.
मी सेल्स मध्ये असतांना खास असे पॅकेज विकलेत जे फक्त शाकाहारी पाहुण्यांना उद्देशून होते. प्रत्यक्षात जेव्हां टूर मॅनेजर म्हणून ग्रुप नेलं तेव्हा एका मारवाडी आणि गुजराती कुटुंबाची शाकाहारी जेवणाच्या बाबतीत गैरसोय होऊ नये अस मला आधीच सांगण्यात आल होत.
खर तर टूर सुरू व्हायच्या पहिल्याच दिवशी बस मध्ये पाहुण्यांना परदेशात जेवणा बद्दलच्या त्यांच्या अपेक्षा आधीच नीट समजावून देणं चांगल असतं. सिंगापुर, मलेशिया आणि थायलंड च्या टूर मध्ये सकाळच्या नाश्ता हा कुठे राहील हे एक रात्र आधीच स्पष्टपणे सांगायचो. या सर्व ठिकाणी चीनी पर्यटक खूप असतात. सर्वच हॉटेलात त्यांच्या साठी जागा पण वेगळी असते खास त्यांच्या आहार संस्कृतिला धरून.
अश्या
वेळेस आपले शाकाहारी पाहुणे चुकून त्यांच्या
जागेत शिरले तर कसं गोंधळ उडू शकतो हे मी अनुभवल आहे. पण इथे एक अनुभव मी आवर्जून सांगतोय.
माझ्या अश्याच एक ग्रुप मधली किशोरवयीन मुलं या चीनी आहार संस्कृतीचा अनुभव घ्यायला
गेले तर त्यांना अडवण्यात आल. मी मग हॉटेल च्या मॅनेजर सोबत बोलून त्यांना ही गोष्ट
सांगितल्यावर त्यांनी अगदी आनंदानी त्यांना परवानगी दिली. पण सोबत हे सुद्धा सांगितलं
की अशे पर्यटक क्वचितच भेटतात.
आपण बाहेरच्या देशात असतांना आपल्याच भारतीय पद्धतीच जेवण हवच असा हट्ट धरू नये अस मला नेहेमी वाटत. हे करतांना आपण अनेक आनंदांना मुकतोय अस आपल्याला वाटत नाही का??!!! 😇
वर
नमूद केलेल्या किशोरवयीन मुलांचा अनुभवांनी मला एक वेगळ्या परंतु महत्वाच्या विषयाकडे विचार
करण्यास प्रवृत्त केलं .. त्याला आपण ‘आहार संस्कृति पर्यटन’ अस म्हणू. येणाऱ्या भागांमध्ये
थोडं या विषयावर माझे विचार आणि अनुभव मांडीन…..
क्रमशः
अमित नासेरी
९४२२१४५१९०
Comments
Post a Comment