विदर्भातील खाद्य संस्कृति - हीच खरी वेळ आहे !!!
पाहुण्यांना टूर वर खुश ठेवायचंय ?? 😇😀
त्यांना छान रेस्टोरंट मध्ये जेवायला न्या .. चविष्ट जेवण जास्ती लक्षात राहत !!! 😀
साइटसीइंग
तर आवश्यक असतच .. जेवण त्याहून जास्ती !!!
दोन वर्षांपूर्वी केरळ मध्ये तिथल्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेण मला अजूनही छान लक्षात आहे. ‘केरला ट्रॅवल मार्ट’ या कार्यक्रमाच्या वेळेस आमच्या ग्रुप ला एका हॉटेल मध्ये नेण्यात आलं. तिथे आमच्या गाइड नि घोषणा केली की आज आपण केरळ मध्ये सण-वार, लग्न-महोत्सव असतांना जे चविष्ट जेवण जेवलं जात त्याचा आनंद घेऊ. त्याला म्हणतात ‘साद्या ‘. ओणम असतांना छान पारंपरिक वेशभूषा घालून केळीच्या पानावर पंच-पक्वान्न वाढली जातात आणि सर्वजण गप्पा मारत जेवतात. हे जेवण आम्हा सर्वांसाठी एक अप्रतिम अनुभव होतं.
इतर राज्यात असे पर्यटन महोत्सव असले तर स्थानिक खाद्य संस्कृतिला अनुसरून कार्यक्रम असतातच.
मला
अस खूपदा वाटत की आपल्या विदर्भातील खाद्य संस्कृति अश्याच छान
पद्धतीने लोकांसमोर मांडावी.
तस
पाहिल तर आपल्या विदर्भात काय नाही !!!??
- · प्राकृतिक संपदा
- · वने
- · आदर- आतिथ्य परिपूर्ण असलेला ग्रामीण भाग
- · ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा
- · तीर्थ क्षेत्रे
आपण सध्या खाद्य संस्कृति बद्दल चर्चा करतोय. थोड विचार केल्यावर अस लक्षात येत की खादाडी ला आपल्याकडे खूप वाव आहे. सावजी खाल्ल्यावर त्याची चव कोणताच खवईया विसरू शकत नाही. शिवाय नागपुरातील संत्री आपल्या आंबट-गोड चविमुळे विश्व प्रसिद्ध आहेतच.
कोविद19 मुळे कंटाळलेल्या लोकांना फक्त एक निमित्तच पाहिजे अश्या ठिकाणी फिरण्याचा (अति-उत्साह नकोच .. सद्यपरिस्थितीत … सर्व काळजी घेऊन !!!)
कोजागिरी पौर्णिमे नंतर आपल्याकडची थंडी वाढते आणि होलिका दहन पर्यन्त टिकते. या वर्षी जवळ पास पाच महीने आपल्या सर्वांसाठी ‘पिकनिक’ सीजन आहे. खूप लांब फिरायला जायचं ‘स्कोप’ नसल्याने असच जवळच्या शेतावर जायचं. चुलीवरच वांग्याच कच्च भरीत, ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी, हिरव्या मिरचीचा ठेचा, झुणका आणि भाकरी खायची असल्यास कळवावे. प्रकृतीच्या सान्निध्यात आपली तब्येत सुद्धा छान राहील. कोविद१९ च्या निमित्ताने सर्वांनाच आपल्या आजू-बाजूची प्रकृति जोपासून आनंद घेण्याचा महत्व कळलं आहेच.
मध्ये माझ्या मित्रा सोबत बसून आपल्या विदर्भातल्या खाद्य संस्कृति बद्दल चर्चा झाली. एकसे -एक भाताचे प्रकार, थालिपिट, चटण्या, लोणची, बेसन चे प्रकार, पुडाची वडी , पाटोडी रस्सा, भाज्या आणि सोबत मांसाहार पदार्थांमध्ये झणझणीत सावजी – चिकन, मटन, खूर, मासे, झिंगा तसेच गोड प्रकारात गूळ पोळी, पुरण पोळी, साटोऱ्या .. अशी चांगलीच मोठी लिस्ट तय्यार झाली.
आता इथे लिहितांना सुद्धा माझ्या तोंडाला पानी सुटलय….😋
वन भ्रमंती साठी पर्यटक देशभरातून आपल्या भागात येतात. अश्या चविष्ट आणि रुचकर, विदर्भातल्या पाककलेचा आस्वाद त्यांनी नक्कीच घ्यावा. अगदी छानश्या हॉटेल मध्ये.
यूरोप मध्ये काही खास पॅकेज मध्ये रेस्टॉरंटच्या जागी ‘स्थानिक लोकांकडे जेवण’ असेही असत.
तिथल्या खाद्य
संस्कृतीशी आणि त्यासोबत तिथल्या लोकांसोबत जवळीक साधण्याचा त्या मागचा उद्देश्य.
आपल्या कडे असा प्रयोग आता आवश्यक वाटतोय !!!
देशातील आणि देशा बाहेरील पर्यटकांना विदर्भातील पाक परंपरा अनुभवायला आणि उपभोगायला देण असा आपण सर्वांनीच प्रयत्न करून पाहावा …..
काय माहिती ??!!! विदर्भात पाककृती पर्यटनाचा पायंडा कदाचित इथेच घातला जाईल….
पण काही काळ वाट पाहावी लागणार… !!
तोपर्यंत
आपल्या जवळची शेतं आपली वाट पाहताय .. लौकर
प्लान करा !!!
अमित
नासेरी
९४२२१४५१९०
Comments
Post a Comment