पंचमढीत राजेंद्रगिरी वर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी' !!

 

कोरोंना काळातले जवळपास दीड वर्ष घरात राहून आम्ही सर्वच कंटाळलो होतो. कुठेतरी फिरायला जाव अस वाटत होतं. जून महिन्यात एक रात्र पेंच नॅशनल पार्क मध्ये मुक्काम केला. बफर मध्ये सफारी सुद्धा केली पण मुलांना अजुन कुठेतरी जावस वाटत असतांना पचमढीचा कार्यक्रम बनला.पावसाळ्याचे दिवस होते. त्यात पचमढी एक उत्कृष्ट मॉन्सून पर्यटन स्थळ आहे यात काही शंकाच नव्हती.

नुकतीच नवी हुंदई सँट्रो आमच्या घरी आली म्हणून त्याच गाडीतून ट्रीप वर जायच ठरलं.

.प्र. पर्यटन ऑफिस मधून कर्णिकर बंगलो मध्ये रूम बूक केली. एकूण ३ रात्र ४ दिवसाचा प्रोग्राम आखला. त्यात जातांना आणि येतांना तामिया मध्ये ब्रेक घ्यायच ठरल. दुपारच आणि रात्रीच जेवण आम्ही बाहेर रेस्टोरंट मध्ये घेणार अस ठरलं.

जायच्या दिवशी सकाळी नाश्ता पॅक करून घेतला आणि छिंदवाडा जातांना घाट चढायच्या अगोदर आम्ही सर्वांनी तो केला. आम्ही दुपारच जेवण सुद्धा पॅक केलेलं होतं जे आम्ही कर्णिकर बंगलो पोहोचल्या बरोबर केलं.

ह्या नागपूर ते पचमढी प्रवासाला मी 'सिनिक ड्राइव' म्हणून नमूद करीन. अर्थातच म.प्र. मध्ये शिरल्यावर रस्ते छान आहेत एकदा तुम्ही परासियाच्या समोर निघाले की आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात अतिशय हिरवगार आणि नजरेत भरणारा आहे. एकदा तामिया घाट उतरले की क्वचितच तुम्हाला रस्ता सरळ मिळेल. अनेक नागमोडी वळण असल्याने गाडी सांभाळूनच चालवावी.

जंगल-नद्या-गावं पार करून आपण मटकुली पोहोचतो. तिथ पर्यन्त रस्ता रुंद आहे. पण मटकुली ते पचमढी या ३५ -४० कि.मि. चा घाटाचा रस्ता अरुंद आहे. समोरून गाडी येत असल्यास आपणच आपली गाडी सांभाळून काढावी हे माझं धोरण ठरलेल होत.

पचमढी मध्ये राहताना जटाशंकर, धूपगढ, बी-फाल, गुप्त महादेव, पांडवलेणी, स्थानिक बाजार आणि तसेच एका


हिल
-स्टेशन मध्ये असणारे इतर महत्वाची ठिकाणं फिरण्याचा आनंद आपण सर्वच घेऊ शकता. या ट्रीप मध्ये आम्ही चौरागढचा ट्रेक वेळेअभावी नाहीं केला.

पहिल्या दिवशी आम्ही जिप्सीतुन फिरलो. पण त्यासाठी आधी डॉल्फिन लॉज वर जाऊन रांगेत उभं राहुन जिप्सी बूक करावी लागते हे आम्हाला रात्रीच कळलं होतं. तुम्हाला धूपगढ सारख्या ठिकाणी जायचं असल्यास जिप्सी शिवाय पर्यायच नाही.

                              आत फिरण्यासाठी जसे रस्ते आहेत त्यावर आपण उगीचच साहस दाखवण्याच्या

भानगडीत पडू नये. अगदी आडव्या - तिडव्या रस्त्यावरून गाडी चालवताना स्थानिक ड्रायवर आणि त्यांच्या ४ व्हील-जिप्सीना नेहेमीच्या सवईच आहे. एकूण पूर्णच दिवस लागतो. तुम्ही पचमढीत कुठेही जा, पाई चालायला किवा ट्रेक करायला खूप वाव आहे. अगदी बी फाल मध्ये खाली उतरताना आणि नंतर वर येताना आपल्याला स्वताच्या फिटनेस बद्दल कळून चुकत.

शहरात कार चालवताना एक गोष्ट लक्षात घ्यावी. इथले रस्ते अरुंद आहेत. समोरून गाडी येत असल्यास आपणच आपली काळजी घ्यावी. लोकं सुद्धा रस्त्यावरून पाई चालताना हॉर्न ऐकूनही बाजूला होत नाही !! आपणच तिथे पाहुणे म्हणून आलो आहोत.. पाहुणेच राहू !!

संपूर्ण पंचमढी मध्ये जिथेही आत जंगलात, धबधब्यापर्यन्त पाई जाल, त्या-त्या रस्त्यावर तुम्हाला मॅगी आणि पकोडे बनवून खिलवणारे लोकं जागो-जागी टपऱ्या लाऊन बसलेले दिसतील. लिंबाच सरबत आणि थंडपेय सुद्धा मिळेल. पाई फिरताना तशी पण भूक लागतेच.

आमच्या पहिल्या दिवसाचा जिप्सीतुन फिरण्याचा निर्णय बरोबर ठरला. जवळपासचे धबधबे व इतर स्थळांवर कार नेण थोडं कठीणच होतं.

दुसऱ्या दिवशी प्लान थोडा बदलला. आम्ही बाजारातून एक वाटाड्या सोबत घेतला. तो सोबत असल्याने कार मधून फिरणं सोईस्कर झालं. त्यांनी आम्हाला हांडी खोह आणि गुप्त महादेवच्या रस्त्यावर असलेल्या वेग-वेगळ्या ठिकाणावर तर नेलच आणि सोबत त्याच रस्त्यावर असलेले इतर फोटो स्पॉट्स वर सुद्धा नेलं.

मागल्या दोन दिवसाच्या वास्तव्यात सकाळचा नाश्ता आम्ही रिसॉर्ट वरच उरकायचो. पण दुपार आणि रात्रीच


जेवण बाजारात असलेल्या रेस्टोरंट मध्येच घेतला
. मला बाहेर जेवताना नेहेमीच प्रश्न पडतो. पैसे खर्च करून सर्वच ठिकाणी जेवताना नेहेमीच एक टिपिकल चव असल्याच जाणवतं. इथेही तोच अनुभव येत होता.

परतताना आमच्या वाटाड्यानी सहज विचारलं कि 'राजेंद्रगिरी' चलाल का? आम्ही हो म्हंटलं. भारताचे पहिले राष्ट्रपति डॉ राजेंद्र प्रसाद यांच हे आवडीच ठिकाण. त्यांना इथे येऊन राहणं फार आवडायच. त्यांच्याच स्मृतीत या जागेला राजेंद्रगिरी म्हंटलं जातं. जस धूपगढ सूर्यास्त पाहण्याच ठिकाण आहे, तशीच ही जागा सुद्धा सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

पण सुर्यास्ता पेक्षा इथला अप्रतिम अनुभव मला नमूद करावासा वाटतो.

कार पार्क केल्यावर तुम्हाला पाई चालत त्या सनसेट पॉइंट पर्यन्त जायच असतं. तिथ पर्यन्त पोहोचताना तुमच्या आजू-बाजूला दुकानांची रेल-चेल दिसते, काही माणसं लहान मुलांना घोड्यावर बसून छोटसं चक्कर मारताना दिसतात , एयर गन घेऊन फुगे फोडणारे स्टॉल पण आहेत.

पण लक्ष वेधून घेतो तो 'मक्के की  रोटी - टमाटर की  चटनी' च दुकान !!😀

अब आया मजा !!😁

आम्ही सर्वच त्या दुकानात जाऊन पाहिल तर एक बाई अगदी हसत मुखाने 'मक्के कि रोटी' थापून चुलीवर तयार करत होती आणि तिचा नवरा सर्वांना त्या गरम- गरम रोटी चटणी सोबत सर्व करत होता.

एकदम 'रूरल टच' वाटत होता.👌

ती रोटी चुलीवर तयार होतानाचा सुगंध, तिथे पसरलेला धूर आणि सोबत चटणी ची फोडणी असं दृश्य पाहिल्यावर आमच्या सर्वांच्या तोंडात पाणीच आलं.

आणि त्याच वेळेस पाऊस सुद्धा पडत होता.

मग काय ?.. नेकि और पूछ पूछ ... ?


भाई ऐसा मौका कौन हाथ से जाने देगा ?

मक्के कि रोटी आणि चटणी वर तर ताव मारलाच सोबत गरम-गरम भजेची फर्माईश केली आणि ते सुद्धा खाल्ले !!😋😍

चांगलाच तास-दीड तास आम्ही 'राजेंद्रगिरी' वर होतो ..

आमच्या पंचमढी मुक्कामातला सर्वात सात्विक अनुभव आम्हाला घेता आला.😃

तसं पाहिलं तर 'मक्के की  रोटी' आणि 'सरसो का साग' असं कॉम्बिनेशन असतं पण इथे चेंज म्हणून 'टमाटर की  चटनी' भलताच भाव खाऊन गेली.

हे सर्व कोणी प्रेमानी गरम- गरम सर्व करत असेल तर त्या 'जरा हटके' अनुभवाची 'वॅल्यू' अजुन वाढते !!

त्या दुकानातली हीच जमेची बाजू होती असं मला इथे असं सांगावंस वाटतं..

आपण पर्यटक म्हणून जिथेही जातो तर शक्यतोवर थोडं वेगळा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे..

या ट्रीप वरुन परतताना रस्त्यात कणीस भाजताना दिसल्यावर कार थांबवून तो खाण्याचा आनंद आम्ही घेतला.

तामिया घाट वर चढून गेल्यावर तिथल्या रेस्ट हाऊसच्या समोर असलेलं विहंगम दृश्य आम्ही चहा पिताना आपल्या डोळ्यात साठवून घेतलं.

महाराष्ट्रात आल्यावर एक गावातून जाताना रस्त्यात भरलेल्या बाजारात कच्चा चिवडा खाल्ला.

पंचमढीच्या ट्रीपला दोन वर्षे झाली. आज सहज त्या ट्रीप चे फोटो पाहताना मुलांनी केलेली मजा मला आठवली आणि नकळत मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो !!😢


अमित नासेरी

9422145190



Comments

  1. व्वा..खूपच छान लिहिलंयस अमित... फोटोही तितकेच छान आले आहेत.. अभिनंदन 👍🏼👍🏼👏🏼👏🏼

    ReplyDelete
  2. Excellent writing. The whole scene stood in front of the eyes. Please continue blogging. If you plan any trip or nature camp, Please let us know.

    ReplyDelete
  3. वा ! किती सुंदर वर्णन ! आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत असं वाटलं आणि पुन्हा एकदा पचमढीला जाण्याची ओढ वाढीला लागली .
    असेच लिहिते रहा .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!