फिरायला केव्हां जाता ?

फिरायला केव्हां जाता ?

तीन महीने झालेत. आम्ही प्रवास व पर्यटन क्षेत्रात राब राब राबणारी मंडळी. चांगला सीजन असताना घरी बसून वेबिनार वर  माहिती घेण्याचे दिवस आमच्यावर आलेत. काय करणार ?? कोविद 19  मुळे मार्च महिन्यापासून विमानं बंद, ट्रेन बंद, बस सेवा बंद, पर्यटन क्षेत्र बंद.   ज्यांच्या बूकिंग होत्या त्यांना पैसे रिफंड ताबडतोब न करू शकल्याने डोक्याला ताप. येणारे सहा महीने कसे जातील याच टेंशन.

नावाजलेल्या मोठ्या संस्था/ कंपन्या पगार कपात, कार्यालयात न येता घरून काम करणे, काहींना लीव विदाउट पे, काहींना ले ऑफ  देऊन काम भागवत असल्याच चित्र दिसतय. विमान कंपन्याची हीच परिस्थिति आहे. एक गोष्ट चांगली झाली आहे की काहींनी क्रेडिट नोट दिल्याने ग्राहकांचे पैसे वाया जायची शक्यता नाही.

आता कुठे लॉकडाउन अंशतः काढण्यात आला आहे. पण त्यामुळे पर्यटन सुरू होईल असं नाही. बराच वेळ लागणार आहे. मनातून भीती घालवून कोणी फिरायला जाईलका हा प्रश्न आम्हा सर्वांना भेडसावत आहे. पर्यटकांची सुरक्षा महत्वाची आहे. धंदा नंतर होईलच पण हे वर्ष तर वाया गेल्यातच जमा आहे.

अश्या परिस्थितीत रिकामं न बसता आणि वेळेचा सदुपयोग करून आपल्या ज्ञानात भर पाडा असं काही कंपन्यांनी तात्कालिक धोरण म्हणून वेबिनार घेण्याचं ठरवलं. जस क्लासरूम मध्ये किवा हॉल मध्ये सेमिनार ( संगोष्ठी) घेतात त्याऐवजी इथे इंटरनेटच्या माध्यमातून मीटिंग, क्लाससेस, ट्रेनिंग देणं सुरू केलं आणि यालाच आपण वेबिनार म्हणतो. महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही तुमच्या घरातच राहून याचा लाभ घेता.

वेबिनारचा अस्तित्व आधी पासूनच होत पण या तीन महिन्याच्या काळात याच महत्व खूपच वाढलय. पर्यटना शिवाय इतर शाळा, कॉलेज, विद्यापीठ, सरकारी व खाजगी संस्था याचा उपयोग लॉक डाउन काळात करताना दिसले.  ट्रेनिंग/ माहिती देणारी व्यक्ति मुंबईत तिच्या घरातून देत असेल आणि इतर मंडळी देशात किवा विदेशात आपल्या घरात बसून त्याचा फायदा घेऊ शकतात. एकूण सांगायच झालच तर या वेबिनार मुळे सर्वच सहकारी संपर्कात राहिले आणि नवीन मित्र सुद्धा बनवले.

राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय पर्यटन क्षेत्रांचं प्रबंधन करणार्‍या बर्‍याच संस्थांनी शक्कल लढवून  एप्रिल महिन्यापासून वेबिनार घेणं सुरू केलय. भारतातल्या असंख्य ट्रॅवल एजेन्सीस मध्ये काम करणारे व्यावसायिक व त्यांचे मालक या सेवेचा लाभ घेताना दिसतात. मी इथे लाभ याचा शब्द प्रयोग विचारपूर्वक केलय. सध्या पैसे कोणीच कमवू शकत नाही पण नवीन जागेची माहिती अतिशय सोप्याभाषेत आणि कमी कष्टात मिळत असेल तर काय हरकत आहे ?

आपल्याच भारतात अश्या  ट्रॅवल संस्थांनानी समूह तयार करून देखो अपना देश महणून वेबिनार घेणं सुरू केलं. व्हाटसप्प वर आधीच वेळ पत्रक देऊन ही ट्रेनिंग दिली गेली आणि हे काम अजूनही सुरू आहे. काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड, हिमाचल, राजस्थान, पूर्वोत्तर राज्य, म.प्र., ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ मधल्या ट्रॅवल संस्था यात सहभागी होऊन माहिती देताय.  याला एक अतिशय स्त्युत्य उपक्रम म्हणायला हरकत नाही.

 याशिवाय आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांचे व्यवस्थापन करणार्‍या प्रतिष्ठित संस्था उत्साहानी यात सहभागी झाल्या आणि आपआपल्या स्तरावर वेबिनार घेतले. जपान,दक्षिण कोरिया, मॉरीशस, सिंगापुर, थायलंड, केनया, साऊथ आफ्रिका, दुबई, यूरोप, स्कंडींनाविआ, रशिया, कॅनडा, यू. एस. ए., दक्षिण अमेरिकेतील देशांची माहिती, तिथल्या खास जागा, तिथले नृत्य, तिथल खान-पान या सर्व बाबी वेबिनार मुळे घरातच कळल्या.

सर्वांना ठाऊक आहे की यावेळेस पर्यटन नसेल होत तरी पुढे नक्कीच होईल. म्हणून आताच पासून अभ्यास करून ठेवा. एप्रिल, मे आणि आता जुन मध्ये वेबिनार घेणं सुरू आहे. एकाच वेळेस दोनशे ते तीनशे व्यावसायिक एका वेबिनार मध्ये सहभागी होत असतात. आपलं नेटवर्क वाढवण्याचा एक चांगला पर्याय सर्वांना मिळालाय.

बर्‍याचदा काम करताना आपल्याला पत्रक किवा प्रवास-पुस्तिकांची मदद घ्यावी लागते. आजकाल यूट्यूब मुळे पर्यटन क्षेत्रांचे विडियो व्यावसायिक आणि ग्राहक दोघांसाठी अभ्यासाकरिता सहज उपलब्ध आहेत. पण वेबिनार मुळे माहिती देणं आणि घेणं हे सुखकर झाल्याच दिसतय.

उदाहरण द्यायचं म्हंटलं तर टर्की मधली संस्था आणि तिथे काम करणार्‍या मंडळींनी वेबिनारच्या माध्यमातून इस्तंबूल मधल्या चार वेग-वेगळया प्रेक्षणीय स्थळांवर त्यांचे सहकारी उभे केले आणि त्याची  माहिती दिली. आमच्या पर्यटन क्षेत्रात  बर्‍याचदा पाहुण्यासोबत बोलणारी आणि त्यांच मार्गदर्शन करणारी मंडळी अश्या जागेची माहिती  चित्र पाहून, पत्रक वाचून आणि विडियो पाहून मिळवतात. पण वेबिनार मुळे आज यांना थेट त्या जागेवर नेण्यात आलं ते ही घर बसल्या.

या वेबिनार मुळे राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय पर्यटन क्षेत्रांची अचूक व चांगली माहिती देणार्‍या सेवासंस्था आणि तिथे काम करणारे विशेषज्ञाचा जगभरातील इतर संस्थांनासोबत साथी हाथ बढाणा या धर्तीवर संपर्क वाढतांना दिसतय. यांच्या सूचना व विचारांच आदानप्रदान एकूण पर्यटन क्षेत्रावर दूरगामी परिणाम ठरवणार.

ऑफबीट पर्यटन ठिकाणांची माहिती महत्वाची ठरत आहे. पाहुण्यांना कित्येक वर्षांपासून एकच-एक जागा सांगताना तिथल्या इतर आकर्षणा बद्दलची माहिती देण्यावर भर वाढला आहे. अगदी आपल्याच घरातली म्हणजे भारतातील गोष्ट सांगायची म्हंटलं तर नावाबांचे शहर लखनऊ मध्ये  दर्दी-खवईय्ये कोण-कोणत्या गल्लीत  चवीष्ट कबाब, मिठाया खाऊन तृप्त होऊ शकतील याचं श्रेय अतुल्य भारत यांच्या वेबिनारला जातं. भारत सरकार पर्यटन विभाग हा एक छानसा उपक्रम राबवत आहे.

अगदी हरयाणा राज्यात तुम्हाला सोनिपात मध्ये घेवर, रोहटक मध्ये रेवडी, कुरुक्क्षेत्रातील बर्फी, जिंद मधल बुरा, गोहना मधली जलेबी या बद्दलची माहिती देण्यात आली. आज हरयाणा राज्य शेती पर्यटनात आणि महामार्ग पर्यटनात आघाडीवर आहे.

कर्नाटकात चिकमगलूर या पर्यटन स्थळाला आवर्जून जा आणि भारतातील सर्वात पहिली कॉफीची पैदास इथेच झाली. अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. अशी माहिती या वेबिनार मधूनच कळली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पर्यटन क्षेत्रातील नावाजलेले महितीगार या कार्यक्रमात उपस्थित होते. या सर्वांनी छोट्या छोट्या कहाण्याच्या माध्यमातून त्या जागा जीवंत केल्या.

पूर्वोत्तर राज्यांबद्दलची माहिती, उत्तराखंड, हिमाचल, लद्दाख इथले ट्रेकिंग किवा ऑफ रोडिंग सोबतच छत्तीसगढ, पंजाब राजस्थान गुजरात अंडमान मधली  माहिती देण्यात आली. आठवड्यातून दोन किवा तीनदा हे वेबिनार घेतले जातात. सर्वात चांगली सोय अशी की यांनी आपल्या सर्व कार्यक्रमांची लिंक यूट्यूब वर दिलीय.

आपल्या सर्वांच्या सोई करिता ती लिंक देतोय   https://www.youtube.com/channel/UCbzlbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/videos

इथे  आतापर्यंत झालेले कार्यक्रम मिळतील.

ही तयारी होत असताना कोविद 19 नंतरच / असतांना पर्यटन कसं राहणार हे सर्वांसाठी अजूनही एक मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण पुढे बोलूच.

                                                                         पुढे सुरू ….

 


Comments

  1. लढत रहा. लढणे आवश्यक आहे. लिहीत रहा. एक नवा पैलू समोर येतो आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park