कृषि पर्यटन ठरणार तारणहार !!!
कृषि पर्यटन ठरणार
तारणहार !!!
अगदी खरय !!! मला यात कुठलीही शंका नाही वाटत ….. !!!
आपण शहरात राहत असताना आठवड्यातून एकदातरी कुटुंबासकट
बाहेर फिरायला जाण पसंद करतो. काहींची अशी सवयच होती. पण काय करणार, गेल्या
चार महिन्यापासून सर्वांनीच कोविद19 मुळे स्वतावर बंधन घातलीय. विषाणूचा प्रसार
होऊ नये म्हणून त्यामागचं कारण. सद्यपरिस्थितीत अत्यावश्यक !!!
कुठलीही भटकंतीची योजना आखण्या अगोदर खालच्या लिंक वर जाऊन नियमावली वाचावी
http://tourism.gov.in/dept-guidelines/13
आणि स्वताला आणि सोबतच इतरांना सुरक्षित ठेवावं.
आता माझ्या कामाबद्दल बोलूया......
पावसाळा सुरू झालाय. पेंच जलाशयात बोट राइडचा आनंद नक्कीच घेता येईल. ज्यांना पावसात भिजण्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी एकदा रामटेकच्या गडावर ट्रेक करावा आणि सोबत कच्चा चिवडा अवश्य ठेवावा. पावसात या चिवड्याची चव एकदम चटकदार आणि जगावेगळी लागते. मी तस अनुभवल आहे म्हणून सांगतोय !!!
पावसाळी पर्यटन आपल्या इथे अजून लोकांच्या
पचनी पडलेला नाही. पण खर सांगतो, एकदा तरी याचा आस्वाद घेऊन पाहा. पावसात
भिजा !!! हिरव्या रंगाचे कितीतरी प्रकार तुम्हाला दिसतील. अर्ध्याहून जास्ती हे
रंग थकवा घालवण्याचा रामबाण उपाय आहेत.
आपल्या इथे ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत मौसम छान असतो. शाळा-महाविद्यालय मधल्या विद्यार्थ्यांच्या सहली, कुटुंबातल्या सहली, सरकारी आणि खाजगी संस्थेत काम करणार्या लोकांच्या सहली या हंगामात होतातच. क्रिकेट खेळण्याचा मौसम हा !!! आपल्याकडे टेस्ट किवा एक दिवसीय सामने जामठा स्टेडियम मध्ये याच काळात पाहता येतात.
या वर्षी परिस्थिति निराळी आहे. लोकांनी
गर्दी पासून दूर राहावे, गर्दी असलेल्या जागेवर जाणे टाळावे गर्दीत
विषाणूचा प्रसार होतो वगैरे वगैरे.
अस असताना कुटुंबांनी फिरण्याची हौस भागवायची
कशी??
मी मागील लेखात कृषि पर्यटनाचा उल्लेख केला. त्यात काही उत्साही शेतकर्यांनी मला याबद्दल संपर्क केला आहे. विषय तसा मोठा आहे. अगदी सोप्या शब्दात समजवायचा माझा हा प्रयत्न.
माझा अभ्यास पर्यटनाचा पण सोबतच मी कृषि
क्षेत्रात जैविक खत आणि जैविक किटनाशक शेतकर्यांपर्यंत नेण्याच काम जवळपास चौदा
वर्षे केलीत. माझ्या संपर्कात अतिशय मेहनती शेतकरी आलेत आणि देवाच्या कृपेने
माझ्या सोबत अजूनही संपर्क ठेऊन आहेत.
हे काम करत असताना शेती करण्याची पद्धती, खास पिकांकरीता प्रसिद्ध असलेली गाव, त्या शेताची जागा, त्याच्या जवळपास वाहणारी नदी, गावातील जुनी जागृत देवस्थान, अश्याच गावाजवळ असलेली लहानशी टेकडी, त्या टेकडी वरती अनेक झाडं, त्या झाडांमधून लाजत-बुजत जाणारी पायवाट, संध्याकाळी गावाकडे परतणार्या गाई गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटयांची टीण टीण, त्यांच्या पायांमुळे उडणारी धूळ, संध्याकाळी कौलारू घरांवरून पांघरूण पसरल्या सारखा धूर….. या सर्व दृश्यांनी माझ्या मनाला नेहेमीच भुरळ पाडलीय.
लहानपणच्या आमच्या गावातल्या खूप आठवणी
आहेत. माझ्या शेतकरी मित्रांमुळे या
आठवणींना नेहेमीच खतपाणी मिळत राहीलयं. हा आनंद जसा मी उपभोगला तसाच माझ्यासारख्या
शहरात राहणार्या कित्येक कुटुंबीयांना याची आजही गरज आहे.
सद्य परिस्थितीत काळजी घ्यायची आहे स्वताची
आणि सोबत असलेल्या शेतकरी बंधूंची. आज नागपूरातली एकूण जनसंख्या पाहिली तर
पंचावन्न ते साठ टक्के लोकांकडे शेती नाही. या कुटुंबातल्या लहान मूल-मुलींना शेती काय
हे पण माहिती नाही. भाजी शेतात कशी
पिकवतात ? लिंबाच झाड कस असतं ?
गाई-गुरं-बैल-बकर्या कशी राहतात? दूध कस काढतात? अश्या बर्याच प्रश्नांना उत्तर या शेतांवर मिळेल.
बस ट्रेन सेवा बंद असल्याने कुठे जाता येणं कठीणच
आहे. कोविद19चा साथ आपल्यासोबत राहणार अस गृहीत धरलं तर कमीतकमी आपण शेतावर
जाण्याच्या आनंदाला मुकणार का?
मुळीच नाही !!!
इथेच पर्यटनाला जबाबदारीची किनार लाभते. आपण
सामाजिक अंतर ठेवा, मास्क - सांनीटईजर चा वापर करा आणि सर्वात महत्वाचं आपल्या
मोबाइल मध्ये आरोग्य सेतु एप असला तर हमखास सुरक्षित राहाल. थोडक्यात, अगोदर सांगितलेल्या लिंक मध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालया कडून जून
2020 मध्ये न्याहारी निवास, होम स्टे आणि फार्म स्टे करिता
नियमावली सादर केलीय. ती शेतकरी आणि
पाहुण्यांसाठी बंधनकारक राहील.
एकूण कल पाहता पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून शनिवार – रविवार अश्या दोन दिवसांवर लोकं जास्तीच मेहेरबान राहतील. स्वताच्या गाडीवर – कार / दुचाकी वर बसून शहरापासून शंभर – दीडशे किलोमीटरच्या आत फेरफटका मारतील असा प्राथमिक अंदाज आहे…..लोकं खूप दिवस घरीच राहणार अस गृहीत धरू नये. कुठेतरी पिकनिकच्या निमित्ताने जातीलच ताजे-तवाने व्हायला.
अश्या वेळेस शेतकर्यांनी पूर्वतयारी दाखवली
तर ग्रामीण पर्यटन - कृषि पर्यटन समन्वयाचा एक क्रांतिकारी पायंडा या वर्षी नक्कीच
पडेल.
कृषि पर्यटनाची सोपी परिभाषा – कुठल्याही शेतकर्यांनी त्याच्या फळत्या-फुलत्या शेतावर केलेला पाहुणचार आणि त्यातून होणार अर्थार्जन.
माझ्या दृष्टीने ही काही नवीन संकल्पना नाही. पूर्वी सुद्धा आपण
आपल्या मित्रांच्या शेतावर जाऊन झुणका भाकर, वांग्याच कच्च भरीत,
तुरीच्या शेंगा खाल्ल्या आहेत. काही मित्रांना शेतातल्या विहिरीवरची आंघोळ फारच आठवते. आजच्या परिस्थितीत एक गरज
म्हणून, याच विचारपूर्वक व्यावसायिकरण होणं आवश्यक झालय.
माझी शेतकर्यांना विनंती आहे. या वर्षी शेतावर
पिकं घेतांना सोबत पाहुणचाराची योजना आखा. शेतावरतीच एक साफ जागा निवडून अशी सावली
असलेली छान बसायची जागा करा, लहान मुलांकरिता खेळण्याची जागा ठेवा, बैलगाडीत बसवून फिरवायचा आनंद द्या, शुद्ध गावरान
जेवणाचा आणि खेळाचा आनंद पाहुण्यांना मिळेल याची काळजी घ्या. आपल्याच गावात
दाखवण्यालायक पुरातन मंदिर असतील तिथे न्या. सर्वात महत्वाचा मुद्दा पाहुण्यांची
सुरक्षा अग्रस्थानी ठेऊन हे सर्व करा.
शेतकर्यांनी याच्याकडे एक उपयुक्त जोड धंदा
म्हणून बघावा. अगदी कुक्कुट पालन, मधुमक्षिका पालन फुलशेती, यासारखा. काळजी ही घ्यावी की आपल्या शेताच रिसॉर्ट बनता कामा नये. नाहीतर
जाणता-आजाणता अश्या सात्विक संकल्पनेवर पाणी फिरेल . ज्ञान आणि मनोरंजन याच अद्भुत
संगम इथे दिसल पाहिजे.
गेल्या दहा-बारा वर्षात आपल्या भागात कृषि-पर्यटना बद्दल जागरूकता निर्माण झालेली आहेच. माझ्या संपर्कात असलेले महिला मंडळाच्या सभा, आजी -आजोबांच्या लग्नाचा वाढदिवस, मैत्रिणीचे समूह, लहान मुलांच्या एकत्र मेळावा, शाळा-महाविद्यालयीन मित्रांचे रौप्य महोत्सव, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सहली, हुरडा पार्टी असे कितीतरी कार्यक्रम साजरे केलेत. इतर शेतकरी सुद्धा शिवार-फेरी महणून अश्या शेतांवर आवर्जून जातात.
आज महत्वाचा विषय आहे या पाहुण्यांना पुन्हा-पुन्हा
यावस वाटण. ही तेव्हाच शक्य आहे जेव्हां आपल्या शेतात काहीतरी खास आकर्षण असेल. ही
आकर्षण, ही बल-स्थान आपण आधीच हेरून ठेवायची.
पाहुण्यांचे उद्गार ‘ अहो आम्ही तुमच्या शेतावर आलो
की कस प्रसन्न वाटतं !!! ’ आपल्यासाठी उत्साहवर्धक ठरतात.
तुमची सेवा देण्याची वृत्ती बघून हेच पाहुणे बाकी लोकांना तुमच्या शेतावर जाण्याची
शिफारस करतात.
एक गोष्ट नक्की आहे, तुमचीच
सर्जनशीलता तुम्हाला यशाच्या मार्गावर पुढे नेईल. शेतातल पिक ही आपली पहिली
जबाबदारी, आपलं पहिलं प्राधान्य. ज्या
पद्धतीने तुम्ही शेती करता, पिकं घेता,
गाई-गुरांची काळजी घेता याची माहिती अगदी आपल्या गावरान भाषेत मनोरंजक पद्धतीने पाहुण्यांना
सांगा. त्यांच्या सोबत आलेली लहान मुल-मुलीं ऐकतील आणि नक्कीच
लक्षात ठेवतील.
महत्वाच काम अस आहे की अश्या लहान
मंडळींकडून एका झाडाच रोपट आपल्या शेतात लावून घ्या किवा भाजी- पाल्याची रोपट लावण
त्यांना शिकवा. शेतावर आलेत ना मग त्यांचे पाय चिखलात माखू द्या….. हा अनुभव ते कधीच नाही विसरणार.
माझ्यासाठी हीच लहान मूल-मुली…..खरी
प्रेक्षक !!! .... खरी लक्ष्य !!!
बाजारातली संत्री नेहेमीच खातात पण आम्ही
शेतावर जाऊन संत्री खाल्ली याच्या सारखी ‘ संत्रा पर्यटन’ ची
जाहिरात कुठेच नाही होणार.
अस्सल ‘ मधु मका ‘ तयार आहे ….. या आणि इथेच शेतावर भाजून खा !!!
हुरडा घ्या हुरडा....अहो बोर्ड काय वाचता?? !!!
शेतात या आणि हुरडा खाण्याचा सात्विक आनंद घ्या !!!
अतिशय चविष्ट पेरु खा आणि खिलवा …..आमच्या
शेतावर आपल स्वागत आहे !!!
अश्या जाहिराती काही दिवसांनंतर तुम्हाला
दिसतीलच…..
अजून लिहिण्यासारख आणि सांगण्यासारख खूप काही आहे या विषयावर .....पुन्हा कधीतरी
!!!
अमित नासेरी
9422145190
खूप छान आहे लेख
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमस्त लिहलय मित्रा... असेच लिहत रहा....👍👍
ReplyDeleteधन्यवाद साहेब..... आपल नाव आणि पत्ता कळेल का ?
Deleteखुप छान वर्णन केले आहे.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअमितजी , खुप छान लिहिले अभिनंदन
ReplyDeleteधन्यवाद साहेब
Deleteचंद्रपूर ची आठवण झाली. मस्त लिहिलंय.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteखूप च सुंदर वर्णन केला, प्रत्येकश शेतावर आल्या सारखा वाटलं.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteबहोत बढिया,अच्छा लिखा है। कोवीड १९ को ध्यान मे रखते हुए कृषी पर्यटन मे सावधानीया बरतनी पडेगी। मेहमानो मे एक गज की दुरी का ध्यान रखकर और उचीत निमयो का पालन होना जरूरी है।
ReplyDeleteसाहेब, धन्यवाद
Deleteउपर टिप्पणी मे नाम नही आया मै रश्मीकुमार अब्रोल जुन्नर 9422000054
ReplyDeleteसर, धन्यवाद...आपणे पढा !!!
Delete