पंचमढीत राजेंद्रगिरी वर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी' !!
कोरोंना काळातले जवळपास दीड वर्ष घरात राहून आम्ही सर्वच कंटाळलो होतो . कुठेतरी फिरायला जाव अस वाटत होतं . जून महिन्यात एक रात्र पेंच नॅशनल पार्क मध्ये मुक्काम केला . बफर मध्ये सफारी सुद्धा केली पण मुलांना अजुन कुठेतरी जावस वाटत असतांना पचमढीचा कार्यक्रम बनला . पावसाळ्याचे दिवस होते . त्यात पचमढी एक उत्कृष्ट मॉन्सून पर्यटन स्थळ आहे यात काही शंकाच नव्हती . नुकतीच नवी हुंदई सँट्रो आमच्या घरी आली म्हणून त्याच गाडीतून ट्रीप वर जायच ठरलं . म . प्र . पर्यटन ऑफिस मधून कर्णिकर बंगलो मध्ये रूम बूक केली . एकूण ३ रात्र ४ दिवसाचा प्रोग्राम आखला . त्यात जातांना आणि येतांना तामिया मध्ये ब्रेक घ्यायच ठरल . दुपारच आणि रात्रीच जेवण आम्ही बाहेर रेस्टोरंट मध्ये घेणार अस ठरलं . जायच्या दिवशी सकाळी नाश्ता पॅक करून घेतला आणि छिंदवाडा जातांना घाट चढायच्या अगोदर आम्ही सर्वांनी तो केला . आम्ही दुपारच जेवण सुद्धा पॅक केलेलं होतं जे आम्ही कर्णिकर बंगलो पोहोचल्या बरोबर केलं . ह्या नागपूर ते पचमढी प्रवासाला मी ' सिनिक ड्राइव ' म्हणून नमूद करीन . अर्थातच म . प्र . मध्ये शिरल्यावर रस्ते छ...