आहार संस्कृति पर्यटन - अशी होते सुरुवात !!!

 लहानपणी आई-वडील आपले लाड पुरवतात - खासकरून खाण्याचे.

अमुक भाजी मला नाहीं आवडत ? 

बर तुला कोणती भाजी आवडते ती बनवू !!! 

अश्या वेळेस समजा  घरात दोन -तीन बहीण-भावंड असलीच  आणि प्रत्येकाची आवड निवड वेग-वेगळ्या असल्याच की तेवढ्या भाज्या बनतील. चांगलाच खर्चीक  प्रकार राहणार. कोणाला गोड  आवडत, कोणाला तिखट नकोच, काही जणांना आंबट पदार्थ आवडतात ……थोडक्यात आपल्या खाण्याबद्दलचे संस्कार घरी रूढ होतात.


बदल तेव्हां घडतो जेव्हा आपल्यावर घर सोडून एकटं राहण्याची वेळ येते. हॉस्टेल वर रूम घेऊन किंवा नातेवाईकांकडे राहण्याची वेळ आली की आपल्या आवडी-निवडी हमखास बदलाव्या लागतात. नोकरीत असतांना खानावळीतल  जेवायची वेळ आपल्यापैकी खूप जणांनी अनुभवली असेलच.  ताटात जे वाढल ते संपवायच अशी सवयच लागते.

अगदी शाकाहारी जेवणाशिवाय काहीच चालत नाही म्हंटल्यावर काही मुलांचे हाल होतांना मी अनुभवले आहेत. त्यांना आपल्या घरच्या आरामदायक आयुष्याची जरा जास्तच सवय होती. काही परिवारातील मुले-मुली अश्या परिस्थितीशी जमवून घेतांना सुद्धा मला दिसलेत. कारण अस की  त्यांच्या वडिलांची नोकरी ही दर दोन-तीन वर्षांनी बदलायची. म्हणूनच नवीन जागा, तिथला हवामान आणि तिथल खान-पानाशी जुळऊन घेण्याची सवय त्यांना चांगलीच होती.


आपण सर्वच अश्या आवडी-निवडीचे गुलाम असतो. मला पोळी, भाजी, चटणी, लोणच, कोशिंबीर, थोडा वरण -भात खायची सवय आहे. कामानिमित्त तीन दिवसाच्या ट्रीप वर तेलंगाणात गेल्यावर तिथे फक्त डोसा-इडली सांभार खावा  लागला. पहिला  दिवस ठीक  वाटल पण  दुसऱ्या दिवशी पोळी खायला मिळेल का अस वाटायला  लागलं.

माझ्यासारख्या मध्यभारतात राहणारे लोकांच्या खाण्याबद्दलच्या आवडी-निवडी अश्याच  पद्धतीने लहानपणापासून पक्क्या होतात. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात आल्यावर देशात आणि तसेच विदेशातील अनेक लोकांशी मी संपर्कात आलो. अनुभवावरून मला लक्षात आलं की अशीच परिस्थिति सर्वांची आहे. पण  मिळेल त्या परिस्थितीशी जुळवून  घेणं हा सर्वांचा मोठा गुणधर्म  होता.

नंतरच्या टूर वरचा सर्वात छान अनुभव कंबोडिया-व्हिएतनाम मधला होता. आधीच पासून या दोन्ही देशांच्या आहार  संस्कृति बद्दल आम्हाला औत्सुक्य. इथे भारतीय रेस्टॉरंट मध्ये तर जेवलोच, सोबतच स्थानिक व्यंजनाचा आनंद सुद्धा घेतला. फक्त एक ठिकाणी आम्हाला एक विचित्र अनुभवाशी सामना करावा लागला. 

सीम रीप वरुन  नोम फेन चा  प्रवास करतांना आमची बस एका  ठिकाणी थांबली. चांगलाच बाजार भरला होता. तिथेच  आम्ही स्थानिक  लोकांना तळलेल्या  किडी छान मिटक्या मारत खात असतांना पाहिल. आपण कस इथे तळलेली कुरकुरीत  कांदा भजी खातो तस ही  तिथली ‘कांदा भजी’ होती.  

वर दिलेला फोटो मोठा करून पहा........😲.. दिसायला 'नॉर्मल' वाटतोय .. पण जवळून पाहिलं तर कळेल.. !!! 

‘आहार संस्कृति पर्यटन’ – अस अनुभव देऊ शकतो ?? .. लांबूनच पहा !!! अस म्हणत आम्ही आपल्या बसमध्ये येऊन स्थायिक झालो. जेवढ्या आपल्या खाण्यालायक वस्तु असतील त्याचीच चव घ्यावी .. !!!

व्हिएतनाम मधला मेकोंग डेल्टा आणि हेलोंग बे मध्ये तिथल्या स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतांनाचा अनुभव छान होता. जे शाकाहारी आहेत त्यांना सुद्धा इथले व्यंजन आवडतील. मांसाहारी जेवणाऱ्यांकरीता तर पर्वणीच आहे. फिश, पोर्क चे वेग-वेगळे पकवान  तुम्हाला इथे खायला मिळतील. हेलोंग बी च्या बोटीवर प्रयोग म्हणून एक डिश बनवायचा एक आनंददाई  अनुभव घेतला.



प्रवास म्हणूनच सर्वांसाठी आवश्यक आहे. देशांतर्गत असो किवा विदेशात. आपल्या भारतात प्रत्येक राज्याची आहार संस्कृति वाचनातून सर्वांनाच माहिती आहे. टीव्ही वर येणाऱ्या पाक-कार्यक्रमातून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचतेय. यूट्यूब वर तुम्हाला खूप जण माहिती देतांना पाहू शकता.  परदेशातील पाहुणे खास भारतीय  रेसिपी शिकण्यासाठी केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान तसेच इतर राज्यात येतात….. ते सुद्धा पैसे देऊन !!!

पुढच्या भागात अजून काही गंमतीदार गोष्टी सांगतो….. आणि आपल्या स्थानिक पातळीच्या ‘आहार संस्कृति पर्यटन’ च्या  वाढत्या गरजेबद्दल  …..

                                                                          क्रमशः

 कृपया पहिला भाग इथे वाचा 

अमित नासेरी

९४२२१४५१९०                

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park