Posts

Showing posts from October, 2020

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Image
  कुछ दिनो पहले   मुझे अपने दोस्त अंबरीश घटाटे   के   ‘औरा पार्क’ को देखने का मौका मिला। नागपुर-अमरावती मार्ग पर , बाज़ारगाँव के दाईं ओर 5 किमी अंदर ,   कथलाबोडी गाँव के ठीक बगल में यह   स्थित है ।   इस   जगह पहुंचते समय   सड़क के दोनों किनारों पर सागौन के अनगिनत पेड़   खड़े होकर आपका स्वागत करते हुए प्रतित होते   हैं । एक बार आप ‘औरा पार्क’ में प्रवेश किये तो   पता चलता है कि आप एक अलग दुनिया में आ गये हैं। श्री अंबरीश और उनके सहयोगी   पिछले 7 से 8 वर्षों से विभिन्न औषधीय पौधों और उनके लाभों को समझाने के लिए कड़ी मेहनत कर रहे हैं। अब इस ‘औरा पार्क’ इतनी बड़ी बात क्या है ? बहुत सारे औषधीय पौधे उत्पादक हैं …. वैसे ही यह भी   एक जगह होगी ..   । मुझे   पर्यटन के क्षेत्र में काफी वर्ष हुए हैं।   मैंने अपने ग्राहक मित्रों और उनके परिवार को पास के   वाटर पार्क में मौज-मस्ती करने के लिए भेजा है और मैं खुद भी गया हूं। लेकिन मैं इस ‘औरा पार्क’ को उस वाटर पार्क से अधिक क्यों महत्व देता हूँ ?? म...

Pure -> Divine ->Holy - > Aura Park

Image
  Last week I got a chance to see my friend Mr. Ambareesh Ghatate's 'Aura Park'. It’s located o n Nagpur-Amravati road, 5 km to the right of Bazargaon. This is a Medicinal Plants project right next to the village of Kathalabodi. On way you are welcomed by the teak trees on both sides of the road. It surely is a pleasing site !!! Once inside the project, you realize that you are transferred to a different world. Mr. Ambareesh Ghatate and his team  have been working hard for the last 7  to 8  years to conserve, grow and propagate different medicinal plants in this vast nursery. They also take lot of efforts to explain the benefits to the guests consisting of students from various professional colleges of Nagpur. Now you all may ask what is so big deal about this ‘Aura Park’?!! 😏 There are a lot of medicinal plant producers in the region.. .... What’s so special??😒 Being from the field of tourism, I have sent lot of client s   and...

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

Image
  मध्यंतरी माझे   मित्र अंबरीष घटाटे यांचा   ‘औरा पार्क’   पाहण्याचा योग आला. नागपूर -अमरावती रस्त्यावर, बाजारगाव च्या थोड पुढे उजवीकडे ५ कि. मी   वर कथलाबोडि   गावाला लागूनच हा ‘जैव-संकल्प’ प्रकल्प आहे.  इथपर्यंत   पोहोचतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला साग वृक्ष आपले सहर्ष स्वागत करतांना उभे असल्याच दृश्य दिसतं. प्रकल्पाच्या आत शिरल्यावर एक वेगळ्याच विश्वात आल्याची जाणीव होते. इथे वेग-वेगळ्या औषधी वनस्पति आणि त्यांचे फायदे समजावून देण्याच मोठ काम अंबरीष आणि त्यांचे सहकारी गेल्या ७  ते ८ वर्षांपासून करताएत. आता तुम्ही सर्व विचाराल त्यात एवढ 'मोठ' काय ? औषधी वनस्पति उत्पादन करणारे बरेच आहेत .. तसेच हे सुद्धा असतील….. !!! मी तस पर्यटन क्षेत्रात काम करणारा व्यक्ति. याच प्रकल्पाच्या जवळच असलेल्या ‘वॉटर पार्क’ मध्ये मी माझ्या ग्राहक मित्रांना व त्यांच्या परिवाराला मजा करायला पाठवल   आहे आणि मी स्वता सुद्धा गेलोय.  पण त्या वॉटर पार्क पेक्षा या ‘औरा पार्क’ ला मी इथे महत्व का देतोय ?? माझ्या आवडी-निवडी ठराविक आहेत अस माझे घरचे आणि ...

विदर्भातील खाद्य संस्कृति - हीच खरी वेळ आहे !!!

Image
  पाहुण्यांना टूर वर खुश ठेवायचंय ?? 😇😀 त्यांना छान रेस्टोरंट मध्ये जेवायला न्या .. चविष्ट जेवण जास्ती लक्षात राहत !!! 😀 साइटसीइंग तर आवश्यक असतच .. जेवण त्याहून जास्ती  !!! दोन वर्षांपूर्वी केरळ मध्ये तिथल्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेण मला अजूनही छान लक्षात आहे. ‘केरला ट्रॅवल मार्ट’ या कार्यक्रमाच्या वेळेस आमच्या   ग्रुप ला एका   हॉटेल मध्ये नेण्यात आलं. तिथे आमच्या गाइड नि घोषणा केली की आज आपण केरळ मध्ये सण-वार, लग्न-महोत्सव असतांना जे चविष्ट जेवण जेवलं जात   त्याचा आनंद घेऊ. त्याला म्हणतात ‘साद्या ‘. ओणम असतांना छान पारंपरिक वेशभूषा घालून केळीच्या पानावर पंच-पक्वान्न वाढली जातात आणि सर्वजण गप्पा मारत जेवतात. हे   जेवण आम्हा सर्वांसाठी एक अप्रतिम अनुभव होतं. इतर राज्यात असे पर्यटन महोत्सव असले तर स्थानिक   खाद्य संस्कृतिला अनुसरून कार्यक्रम असतातच. मला अस खूपदा वाटत की आपल्या विदर्भातील खाद्य संस्कृति अश्याच   छान   पद्धतीने लोकांसमोर मांडावी. तस पाहिल तर आपल्या विदर्भात काय नाही !!!?? आपल्याकडे आहेत ....  ·  ...

आहार संस्कृति पर्यटन - अशी होते सुरुवात !!!

Image
  लहानपणी आई-वडील आपले लाड पुरवतात - खासकरून खाण्याचे. अमुक भाजी मला नाहीं आवडत ?  बर तुला कोणती भाजी आवडते ती बनवू !!!  अश्या वेळेस समजा   घरात दोन -तीन बहीण-भावंड असलीच   आणि प्रत्येका ची आवड निवड वेग-वेगळ्या असल्याच की तेवढ्या भाज्या बनतील. चांगलाच खर्चीक   प्रकार राहणार. कोणाला गोड   आवडत, कोणाला तिखट नकोच, काही जणांना आंबट पदार्थ आवडतात ……थोडक्यात आपल्या खाण्याबद्दलचे संस्कार घरी रूढ होतात. बदल तेव्हां घडतो जेव्हा आपल्यावर घर सोडून एकटं राहण्याची वेळ येते. हॉस्टेल वर रूम घेऊन किंवा नातेवाईकांकडे राहण्याची वेळ आली की आपल्या आवडी-निवडी हमखास बदलाव्या लागतात. नोकरीत असतांना खानावळीतल   जेवायची वेळ आपल्यापैकी खूप जणांनी अनुभवली असेलच.   ताटात जे वाढल ते संपवायच अशी सवयच लागते. अगदी शाकाहारी जेवणाशिवाय काहीच चालत नाही म्हंटल्यावर काही मुलांचे हाल होतांना मी अनुभवले आहेत. त्यांना आपल्या घरच्या आरामदायक आयुष्याची जरा जास्तच सवय होती. काही परिवारातील मुले-मुली अश्या परिस्थितीशी जमवून घेतांना सुद्धा मला दिसलेत. कारण अस की   त्यांच्या वडि...

आहार संस्कृति पर्यटन - एक महत्वाचा दुवा !!!

Image
  अन्न हे पूर्णब्रम्ह !!! कुठल्याही पर्यटन स्थळाची ओळख – देश असो परदेश असो..  तिथे मिळणाऱ्या जेवणामुळे जास्त लक्षात राहत.  मी भारतात फिरस्ती वर असतांना भूक लागली की कुठल्यातरी खानावळीत जेवतो. अगदीच बजेट व्यवस्थित असेल तर थोड चांगल्या रेस्टोरंट मध्ये जेवणाचा आनंद सुद्धा घेतो.  मला स्थानिक व्यंजनाचा आस्वाद घेता  येईल या महत्वाच्या विषयाकडे आवर्जून लक्ष देतो. टुर मॅनेजर म्हणून ग्रुप सोबत असतांना थायलंड, मलेशिया आणि सिंगापुर मध्ये भारतीय रेस्टोरंट मध्येच जेवायच असा प्रकार माझ्या पूर्वीच्या कंपनीत व्हायचा. पण   ते एक साचेबद्ध काम होत. त्यावेळेस मला काही पाहुणे म्हणाले सुद्धा की आम्हाला स्थानीक   जेवण एकदा तरी चालेल. मला निश्चितच   ही एक कौतुकाची बाब वाटायची. तसा फीडबॅक मी माझ्या कंपनीला दिल सुद्धा. आज पर्यटन क्षेत्रात काम करतांना एक गोष्ट तर कायमची लक्षात राहते ती  अशी की तुम्ही  जगाच्या पाठीवर कुठेही जाल, आपल्या भारतीय पर्यटकांना त्यांच्या  आवडीच जेवण मिळाल की सर्वच खुश असतात.  आपल्या इथल्या सर्वच कंपन्या बाहेरच्या देशात तिथल्य...