वेबिनारायण नमः
वेबिनारायण नमः कोविद19चा प्रसार थांबवण्या करिता सरकारी आदेश होता. त्यात काही महत्वाच्या बाबी होत्या गर्दी न करण्याचा , आपसात न भेटण्याचा , बाजारात न जाण्याचा वगैरे वगैरे. पण आपल्या भारतीय संस्कृतित आपण एक-दूसर्याला भेटल्याशिवाय राहुच शकत नाही. अश्यावेळेस इंटरनेट वरून सर्वांशी संपर्क ठेवण्याचे काही महत्वाचे एप्स अगदी देवासारखे धाऊन आले. याचा उपयोग सर्वांनी घरबसल्या संगणकावर आणि मोबाइल वर इतका केलाय की ‘ इट्स ए न्यू नॉर्मल ‘ !!! लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षात लोकं आपसात न भेटता झूम , गूगल टीम , वेबेक्स , टेलिग्राम , एमएस मीट आणि इतर अश्याच वापरण्यास सोपे सॉफ्टवेअर मुळे संपर्कात होती. इथे घरी चांगल इंटरनेट असण्याची पहिली अट. सेल-मोबाइल वर याला डाऊनलोड करू शकल्याने जगभरातल्या लोकांच्या संवादाला एक वेगळीच दिशा मिळाली. आपल्याला विडियो कॉलिंग/कॉन्फ्रेंसिंग काही नवीन नाही. पण , या एप्स मधल्या तंत्रज्ञानामुळे चार पावलं पुढे टाकत अधिकाधिक लोकांना सोबत घेऊन मीटिंग , ट्रेनिंग देण्याचं कल वाढल्याच दिसलं. सोबतच यांचा बॅकअप आपल्याला घेता येतो. भारतात असलेल्या जगभरातल्या संस्था आणि त्याती...